विजयाचा अंदाज दिसताच मुख्यमंत्रिपदावर शिंदे गटाचा दावा

Shinde group claims the Chief Minister's post as soon as victory is predicted

 

 

 

राज्यातील सर्व 288 जागांचे कल हाती आले असून सत्तेसाठी मॅजिक फिगर असलेली संख्य महायुतीने गाठल्याचं दिसून आलं. महायुतीने 151 जागांवर आघाडी घेतली असून महाविकास आघाडी 125 जागांवर आघाडीवर आहे.

 

असेच कल राहिल्यास महायुतीचे सरकार येण्याची शक्यता आहे. त्यातच एक मोठी बातमी येत असून मुख्यमंत्रिपदावर शिंदे गटाने दावा केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मुख्यमंत्रिपदावर शिंदे गट दावा करेल अशी प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली.

 

एबीपी माझाशी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे म्हणाले की, “या निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी मेहनत घेतली.

 

सुरूवातीच्या कलामध्ये महायुतीला बहुमत मिळण्याचं दिसून येतंय. महायुतीने विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढली. त्याला मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला.

 

महिला मतदारांनीही मोठा प्रतिसाद दिला आणि महायुतीला साथ दिल्याचं दिसून आलं. मुख्यमंत्री शिंदेंचे कर्तृत्व आणि त्यांची लोकप्रियता कामाला आल्याचं दिसून आलं.”

राजू वाघमारे म्हणाले की, “महायुतीचं सरकार सत्तेत आलं पाहिजे असं ध्येय होतं. मुख्यमंत्री शिंदे हे सर्वसामान्यांचे नेते असून पहाटे पाच वाजेपर्यंत ते काम करतात.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा महायुतीच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं पारडं हे अधिक जड असणार आहे.

 

म्हणूनच मुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदे यांचा दावा पहिला असेल. पण महायुतीचे सर्व नेते एकत्र बसून यावर अंतिम निर्णय घेतील.”

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *