कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार कोसळणार ;मोठ्या नेत्याचा दावा ?

Congress government will collapse in Karnataka; claim of a big leader? ​

 

 

 

 

कर्नाटकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. जे महाराष्ट्रात झालं तेच पुन्हा कर्नाटकमध्ये होऊ शकतं. जेडीएस नेते कुमारस्वामींनी हा दावा केला आहे. कर्नाटकात भाजपचं सरकार येऊ शकतं, असं ते म्हणालेत.

 

 

माजी मुख्यमंत्री तथा जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की,

 

 

५० ते ६० आमदारांचा एक मोठा गट फुटून भाजपमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे कर्नाटकमधील काँग्रेस सरकार कोसळू शकतं. कुणामध्येत प्रमाणिकपणा उरले नाहीये.

 

कुमारस्वामी यांच्या या दाव्यामुळे राजकीय परिघात खळबळ उडाली आहे. भाजपने महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये जो प्रयोग यापूर्वी केलेला आहे, तोच प्रयोग पुन्हा एकदा होऊ कर्नाटकात होऊ शकतो.

 

 

मागच्या वर्षी जूनमध्ये महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांना घेऊन बंड केलं होतं. त्यात शिवसेनेचे ४० आमदार होते. त्यामुळे राज्यात सत्तापालट झाली आणि शिंदे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागलं होतं.

 

 

कर्नाटकमध्ये खरंच भाजपकडून पडद्याआडून हालचाली सुरु आहेत का, याबाबत स्पष्टता नाहीये. परंतु कुमारस्वामी यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने तसा दावा केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

 

 

 

देशात एकीकडे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. तेलंगणामध्ये काँग्रेकडे सत्ता गेली असली तर भाजपने एका जागेवरुन

 

 

 

आठ जागेपर्यंत मजल मारली. त्यामुळे कर्नाटकवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपने प्लॅन तयार केला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *