एकदा बघाच ! ट्रम्प आणि जेलेंस्की यांच्यात हाणामारीचा VIDEO तुफान व्हायरल

Watch it! VIDEO of a fight between Trump and Zelensky goes viral

 

 

 

 

मागच्या महिन्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेंस्की अमेरिका दौऱ्यावर गेले होते. मोठ्या अपेक्षेने ते अमेरिकेत पोहोचले होते. अमेरिकेकडून रशियाविरोधात मदत मिळावी हा त्यांचा हेतू होता.

 

पण यावेळी जे घडलं, ते सगळ्या जगासाठी धक्कादायक होतं. जाहीर मीडियासमोर डोनाल्ड ट्रम्प आणि जेलेंस्की यांच्यामध्ये भांडण झालं. व्हाऊट हाऊसच्या इतिहासात जे कधी घडलं नव्हतं,

 

ते पहिल्यांदा घडलं. जेलेंस्कीची बोलण्याची पद्धत ऐकून ट्रम्प इतके भडकले की, जेलेंस्की आपले पाहुणे आहेत हे सुद्धा ते विसरुन गेले. त्यांनी सर्वांसमोर जेलेंस्कीना चार गोष्टी सुनावल्या.

 

ट्रम्प यांनी युक्रेनला त्यांची जागा दाखवून दिली. जेलेंस्कीना ते एवढं सुद्धा बोलले की, तुम्ही तिसऱ्या विश्व युद्धाचा जुगार खेळताय. विषय इतका वाढला की, अमेरिकी NSA माइक वेंस यांना मध्ये हस्तक्षेप करावा लागला.

 

या सगळ्या वादाला आता दीड महिना होत असताना व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प आणि जेलेंस्की यांच्यात जे घडलं, त्याचं पुढचं इमॅजिनेशन AI ने केलं आहे.

 

AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच वारं आहे. पुढच भविष्य म्हणून AI कडे पाहिलं जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आता बरीच कामं सोपी होत चालली आहेत.

 

मानवी श्रम आणि वेळ वाचत आहे. सध्या अमेरिका आणि चीन हे दोन देश AI वापरण्यात आघाडीवर आहेत. मानवी जीवन अजून सुसह्य करण्याच्या दृष्टीने AI कडे पाहिलं जात आहे. पण याच AI चे काही तोटे सुद्धा आहेत.

 

हे तोटे आता समोर येऊ लागले आहेत. व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प आणि जेलेंस्की यांच्यात जी शाब्दीक बाचाबाची झाली, ती प्रत्यक्षात हाणामारीमध्ये कशी असेल, ते AI ने दाखवून दिलं आहे.

 

ट्रम्प आणि जेलेंस्की यांच्यातील हाणामारीचा व्हिडिओ AI ने बनवला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू येईल. पण भविष्यात AI मुळे काय आणि किती चुकीच्या गोष्टी घडू शकतात ते सुद्धा तुम्हाला समजेल.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *