महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोदी-शहाकडून सस्पेन्स कायम

Suspense remains between Modi-Shah regarding Maharashtra CM post

 

 

 

राज्यामध्ये अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर महायुतीचं सेलिब्रेशन अनेक ठिकाणी दुसऱ्या दिवशीही सुरु होतं. विशेष म्हणजे एकीकडे सेलिब्रेशनला जोर आलेला असतानाच दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण बसणार

 

याबद्दलचा संभ्रम कायम आहे. भारतीय जनता पार्टी हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्या खालोखाल एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि तिसऱ्या क्रमाकांवर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून

 

मुख्यमंत्री पदावर भाजपा दावा सांगणार का याबद्दल अद्याप संभ्रम कायम आहे. असं असतानाच आता नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. राज्याच्या राजकारणामधील सर्वात मोठी बातमी म्हणता येईल अशी ही बातमी आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळवल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पसंती आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

मुख्यमंत्री कोण याबाबत सस्पेन्स कायम असताना भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस यांच्याकरता अनुकूल आहे.

 

महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण ताकतीनिशी भाजपाच्या मागे उभा होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत

 

घसरलेला कामगिरीचा आलेख कमालीचा उंचावला आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी तर वाढलीच त्याचबरोबर भाजपालाही घवघवीत यश मिळालं आहे.

जून महिन्याच्या सुरुवातील लागलेल्या लोकसभा निकालामध्ये भाजपाला मोठा फटका बसल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत भाजपाने घेतली नाही अशी टीका झाली होती.

 

या टीकेनंतर भाजपाने सावध भूमिका घेत विधानसभेला ही चूक सुधारली. विधानभेला भाजपाबरोबरच महायुतीच्या विजयामागे संघाच्या कार्यकर्त्यांचं पाठबळ नक्कीच कारणीभूत ठरलं.

 

पडद्यामागे प्रचारापासून ते संघटनात्मक बांधणीपर्यंत अनेक गोष्टींमधून संघाने भाजपाला अधिक मजबुतीने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मदत केली. लाडकी बहीण, बटेंगे तो कटेंगे,

 

एक है तो सेफ हैपेक्षाही प्रत्यक्षात मैदानात उतरुन संघ कार्यकर्त्यांना केलेल्या कामाचा अधिक प्रभाव मतदानावर आणि मताधिक्यावर दिसून आला.

मतदानाच्या दिवशीही फडणवीसांनी नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. अवघ्या 15 मिनिटांच्या या भेटीत काय चर्चा झाली

 

हे गुलदस्त्यात असलं तरी सध्या संघ फडणवीसांवर खूष असून मुख्यमंत्री म्हणून त्यांनाच बघू इच्छित असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता मातृक संस्थेचं हे मत केंद्रीय नेतृत्व स्वीकारणार का? फडणवीसांची मुख्यमंत्री पदाची वाटचाल अधिक सुखकर झाली आहे.

 

महाराष्ट्रात कोणाची सत्ता या प्रश्नाचं उत्तर आता समोर आलं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाला नुकताच जाहीर झाला आणि यामध्ये महायुतीचच पारडं जड असल्याचं दिसून आलं.

 

सत्तेच्या चाव्या एकमतानं महायुतीकडेच असल्याचं स्पष्ट होत असलं तरीही मुख्यमंत्रीपदी कोणाच्या नावाला पसंती दिली जाणार इथपासून राज्यात सत्तास्थापना

 

आणि मुख्यमंत्र्यांचा शपथविधी नेमका केव्हा पार पडणार याविषयीच्याच प्रश्नांना सातत्यानं वाव मिळताना दिसला. त्यातच राष्ट्रपती राजवटीसंदर्भातील माहितीसुद्धा समोर आली.

26 नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार अस्तित्वात येणं किंवी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणं बंधनकारक नाही अशी माहिती विधामंडळातील सूत्रांनी दिली आहे.

 

विद्यमान विधानसभेची मुदत 26 तारखेला संपत असल्याने राज्यात मध्यरात्री 12 नंतर राष्ट्रपती राजवट लागेल ही धारणा चुकीची असल्याचंही सूत्रांनी स्पष्ट केलं. या शक्यतेस गतकाळातील काही उदाहरणंही दिली.

 

यापूर्वी एनेकदा विधानसभेची मुदत संपल्यानंतरही मुख्यंत्र्यांचे शपथ विधी झाले आहेत. दहाव्या विधानसभेची मुदत 19 ऑक्टोबर 2004 रोजी संपली होती, ज्यानंतर 11 व्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 1 नोव्हेंबर 2004 रोजी झाला होता.

 

तर, अकराव्या विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबर 2009 रोजी संपली आणि बाराव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 7 नोव्हेंबर 2009 रोजी झाला होता.

 

पुढं बाराव्या विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबर 2014 रोजी संपली त्यानंतर तेराव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 31 ऑक्टोबर 2014 रोजी झाला होता.

 

तेराव्या विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर 2019 रोजी संपली तर चौदाव्या विधानसभेतील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 28 नोव्हेंबर 2014 रोजी झाला होता.

 

थोडक्यात राज्यात सरकार स्थापन होण्यास वेळ घेतला जात असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळं 26 तारखेपूर्वीच नवीन सरकार अस्तित्वात आले पाहिजे असे कोणतेही संवैधानिक बंधन नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

त्यामुळं नवीन सरकार अस्तित्वात कधी येणार आणि शपथविधीचा मुहूर्त नेमका कधी साधला जाणार याबाबत राज्यभरात उत्सुकता पाहायला मिळत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *