देशातील सर्वात धक्कादायक निकाल;65 टक्के मुस्लीम मतदार असलेल्या मतदार संघात भाजपचा प्रचंड मतानी विजय

The most shocking results in the country; BJP wins by a huge margin in a constituency with 65 percent Muslim voters

 

 

 

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहीर होत असतानाच उत्तर प्रदेशातील एका पोट निवडणुकीत भारताच्या राजकारणातील

 

सर्वात आश्चर्यकारक निकाल पहायला मिळाला आहे. 65 टक्के मुस्लीम मतदार असलेल्या कुंदर्की मतदार संघात भाजपच्या हिंदू उमेदवार प्रचंड मतानी विजयी झाला आहे.

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसोबतच अनेक राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकाचेही निकाल जाहीर झाले आहेत. उत्तर प्रदेशातील

 

मुरादाबादच्या कुंदर्की मतदार संघातील निकाल हा देशातील सर्वात धक्कादायक निकाल ठरला आहे. या मुस्लिमबहुल मतदार संघावर 2012 ते 2022 पर्यंत समाजवादी पक्षाची पकड होती.

 

पहिल्यांदाच या मतदार संघात भाजपचे एकमेव हिंदू उमेदवार रामवीर सिंह ठाकूर यांनी सपाचे मोहम्मद रिझवान यांचा पराभव केला आहे.

 

रामवीर सिंह ठाकूर तब्बल 143192 मतांनी विजयी झाले आहेत. सपाचे उमेदवार मोहम्मद रिझवान यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

 

60 टक्के मुस्लीम मतदार असलेल्या कुंदर्की मतदार संघात 30 वर्षापासून मुस्लीम उमेदवार आमदार म्हणून निवडून येतो. मात्र, भाजपच्या एका हिंदू उमेदवाराने मुस्लीम उमेदवाराचा पराभव केला आहे.

 

60 टक्के मुस्लिम मतदार  असं असताना मुस्लिमबहुल भागातील हिंदू उमेदवार विजयी कसा झाला

 

असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सबका साथस सबका विकास असा नारा देत रामवीर सिंह ठाकूर यांनी निवडणूक लढवली. महाराष्ट्रात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *