काही तासात चक्रीवादळ धडकणार;अतिमुसळधार पावसाचा इशारा
Cyclone to hit in a few hours; warning of heavy rain
चक्रीवादळाच्या रुपानं पुन्हा एकदा एक मोठं संकट देशावर घोंगावत आहे. फेंगल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण भारतातील राज्यांना बसण्याची शक्यता आहे. तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये फेंगल चक्रीवादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण -पश्चिम बंगालाच्या खाडीवर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र उत्तर -पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव हा तामिळनाडूच्या किनारपट्टी भागांमध्ये तसेच कराईकल आणि महाबलीपूरमदरम्यान जाणवण्याची शक्यता आहे.
या काळात ताशी 70 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू आणि पँडेचेरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तामिळनाडूसह आध्र प्रदेशचा किनारी भाग आणि रायलसीमा तसेच या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आव्हान करण्यात आलं आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार फेंगल चक्रीवादळ हे आज सकाळी साडेआठ वाजता त्रिंकोमाली पासून 110 किलोमीटर, नागपट्टिनम पासून 310 किलोमीटर तर चेन्नईपासून 480 किलोमीटर दूर होतं.
हे चक्रीवादळ श्रीलंकनं किनारी प्रदेशाला धडकून भारतात तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनार पट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यामुळे मोठं नकुसान होऊ शकतं.
दरम्यान महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा विशेष असा काही परिणाम जाणवणार नसून, किनारी भागांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यात आहे.
दरम्यान नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्यात थंडी वाढत असल्याचे बुधवारी अकोल्यात जाणवले. किमान तापमान १३.६, तर कमाल तापमान ३०.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
अकोला जिल्ह्यात ३ डिसेंबरपर्यंत हवामान कोरडे राहिलं, असे हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
तीन दिवसांपासून पारा घसरत असल्याचं चित्र आहे. यंदा सरासरी ६९३.७ मिमी पाऊस अपेक्षित असताना, ८११.२ मिमी पाऊस झाला. त्यामुळे थंडीचा जोर वाढत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
वाढत्या थंडीचा फटका रस्त्यावर उघड्यावर राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात बसतो आहे. वाढत्या थंडीमुळे अकोला जिल्ह्यातील माना, या गावात एका व्यक्तीचा थंडीमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
माना येथील प्रवासी निवाऱ्यात एक व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. प्रकाश मार्कंड असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. मृत व्यक्तीचं वय वर्ष ६० वर्ष असून त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुले असं कुटुंब आहे.
प्रकाश मार्कंड हे मूळचे धुळे जळगाव येथील असून ते काही वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यातील माना या गावामध्ये वास्तव्यास होते. त्यांची शेती माना येथे असल्यामुळे ते धुळे जळगाव ते माना अशी ये – जा करत राहायचे.
त्यांची बहीण वयोवृद्ध असून त्या माना इथे राहायच्या. त्यांच्याच घरुन बुधवारी धुळे येथून रेल्वेने प्रवास करून सकाळच्या सुमारास प्रकाश मार्कंड माना इथे पोहोचले. ते माना इथे त्यांच्या बहिणीच्या घरी गेले.
६० वर्षीय प्रकाश हे माना पोलीस स्टेशन परिसरात फिरत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने आश्रय घेण्यासाठी त्यांनी प्रवासी निवाऱ्याचा सहारा घेतला.
मात्र थंडीमुळेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आता व्यक्त केला जात आहे. या संदर्भात माना पोलीस अधिक तपास करत आहेत.