EVM प्रकरणी शरद पवार काय भूमिका घेणार ?

What role will Sharad Pawar take on the EVM issue?

 

 

 

ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलनाला सुरुवात केलेली मारकडवाडी हे गाव आता देशात चर्चिलं जाऊ लागले असून शरद पवार हे सकाळी हेलिकॉप्टरने या गावात दाखल होणार आहेत.

 

बॅलेट वर मतदान करण्यात यावे यासाठी या गावाने 29 नोव्हेंबर पासून आंदोलनाला सुरुवात केली होती. या गावात तीन डिसेंबर रोजी मतदान घेण्याचा निर्णय करण्यात आला होता.

 

मात्र प्रशासनाने 2 डिसेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत या गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करत बॅलेटवर मतदानास विरोध केल्याने अखेर 3 डिसेंबर रोजी होणारे मतदान ऐनवेळी रद्द करावे लागले होते .

 

सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या गावात येऊन ग्रामस्थांची भूमिका जाणून घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बॅलेटवर मतदान करण्याबाबतच्या याचिका फेटाळून लावल्यानंतर आता

 

पुन्हा शरद पवार याबाबत न्यायालयात जाणार असल्याची चर्चा आहे. उद्या पवार नेमकी काय भूमिका घेत आहेत हे समोर येणार असून राहुल गांधी देखील या गावात येणार असल्याची चर्चा आहे.

मार्कडवाडी येथे विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना गावात कमी मते असल्याचे समोर आल्याने अंतर त्यांच्या गटाने यावर आक्षेप घेतला होता.

 

याचवेळी विरोधी भाजपच्या समर्थक ग्रामस्थांनी या बॅलेट वरील मतदानावर बहिष्कार टाकल्याने याबाबत गावात उघड दोन गट पडलेले आहेत .

 

हे आंदोलन शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांनी सुरू केले असून याला संपूर्ण मार्कड वाडी चा पाठिंबा नाही.

 

राज्य निवडणूक आयोगाने ही याबाबत खुलासा करीत मारकडवाडी येथील तीनही बुधवर झालेले मतदान आणि मतमोजणी समोर आलेले मतदान हे सारखेच असून

 

यात विनाकारण मशीन बाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले होते. याशिवाय संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत जानकर

 

गटाचे प्रतिनिधी पहिल्यापासून शेवटपर्यंत उपस्थित असूनही त्यांनी याबाबत कोणतीही तक्रार अथवा अक्षय निकाल लागेपर्यंत घेतलेला नव्हता .

विधानसभा निवडणुकीत वातावरण अनुकूल होतं पण निकाल अनुकूल लागला नाही. ईव्हीएमबाबत माझ्याकडे अधिकृत आकडेवारी नाही, त्यामुळं यावर आताच बोलता येणार नाही.

 

महायुतीकडे बहुमत आहे हे मान्य केलं पाहिजे. मतांचे आकडे हे आश्चर्यकारक आहेत. काँग्रेस पेक्षा शिंदे यांना मतं कमी आहेत पण त्यांचे जास्त आमदार निवडून आलेत.

 

ईव्हीएम बाबत शंका घेण्याचं कारण नाही. काही ठिकाणी भाजपचा पराभव देखील झाला आहे. पण मोठी राज्य भाजपकडे गेली आहेत, असंही पवार यांनी सांगितलं.

 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, निवडणूक प्रक्रिया संपली आहे. मारकडवाडी इथं बंदी घालण्याचं कारण काय? त्या गावातील लोकांना पहायचं होतं की मतं कुणाला किती पडली.

 

त्यामुळे आम्ही आता ठरवलं आहे की त्या गावातील लोकांचं काय म्हणणं आहे. आम्ही एकत्रपणे येणाऱ्या सर्व निवडणुकीला सामोरं जाणार आहोत.

 

पराभव झाला म्हणून नाराज व्हायचं नाही. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांचे म्हणणे आहे की महाविकास आघाडी सोबत पुढे जायचं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *