मराठवाड्यातील शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याची आमदारकी धोक्यात

The MLA seat of a senior leader of the Shinde faction in Marathwada is in danger.

 

 

 

राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत हे मागील काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत आले आहे.

 

आता तानाजी सावंत यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने तानाजी सावंत यांना नोटीस बजावली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक उमेदवार राहुल मोटे यांनी याचिका दाखल केली. विधानसभा निवडणुकीत मतदारांना आर्थिक आमिष दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

तानाजी सावंत यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असून खंडपीठाने सावंत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 

या याचिकेच्या माध्यमातून सावंत यांच्या विरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान कोर्टाने जरी नोटीस बजावली असली तरी ती अद्याप पर्यंत सावंत व इतर कोणांना ते नोटीस प्राप्त झाले नसल्याची माहिती तानाजी सावंत यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

 

तानाजी सावंत यांनी मतदारांना आमिश दाखवण्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. तानाजी सावंत यांनी मतदारांना साडी, भांडी, पैसे वाटप केले आहे,

 

याचे पुरावेही जोडले आहेत. याबाबत तानाजी सावंत यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे. भगिरथ कारखाना तानाजी सावंत यांचे बंधू शिवजी सावंत, क्रांती महिला उद्योग समूहाच्या अर्चना दराडे यांनाही नोटीस देण्यात आली आहे.

 

 

गेल्या वेळी ही राहुल मोठे पराभूत झाल्यानंतर त्यांनी सावंत यांच्या विरोधात मतदारांना आम्ही दाखवल्याचे आरोप करत तक्रार केली होती.

 

याही वेळेस राहुल मोठे यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर आता राहुल मोटे यांनी निवडणुकीत झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *