मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी महायुतीत नाराजीनाट्य,नाराज शिंदे ठाण्यात

Dissatisfaction in the Mahayuti before the cabinet expansion, angry Shinde in Thane

 

 

 

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतरही अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली नाही. शिंदे गटाला गृह आणि महसूल खातं हवं असल्याने मंत्रिपदाचा घोळ कायम आहे.

 

हा तिढा सुटता सुटत नसल्याने आता प्रश्न दिल्ली दरबारी जाणार आहे.त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दि्ल्लीला रवाना झाले आहेत.

 

मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द झाला असून ते दिल्लीला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी जो प्रस्ताव दिला आहे त्यासंदर्भत भाजपचे काय म्हणणे आहे हे अद्याप समोर आलेले नाही. यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या तरी कुठे जाणार नाहीत .

 

⁠दिल्लीला जाणार होते अशी चर्चा होते, ⁠तुर्तास तरी एकनाथ शिंदे हे ठाण्यातच थांबणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ते दिवसभर ठाण्यातील बंगल्यावरच थांबणार आहेत.

 

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घवघवीत यशानंतर पहिल्यांदाच आज प्रमुख नेते दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीला रवाना झाला आहेत.

 

दिल्लीच्या बैठकीत आज काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. फडणवीस,पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊ शकतात. शपथविधीनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच दिल्लीत येत असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट होऊ शकते.

 

भाजपमधील मंत्रीपदाची नावं निश्चित करण्यासाठी फडणवीस आणि बावनकुळे हे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटू शकतात.फडणवीस,पवार यांची नड्डा आणि शहा यांच्यासोबत एकत्रित बैठक होऊ शकते.

 

दोन्ही नेते जरी दिल्लीत येत असले तरी आज भाजपची पक्ष स्तरावरची कोणतीही बैठक नियोजित नाही. वेगवेगळ्या विमानांनी दिल्लीत येत असल्यामुळे भेटी या मागे पुढे होऊ शकतात.

 

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने फडणवीस आणि बावनकुळे हे पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना संसदेमध्येही भेटू शकतात.आजच्या दिल्लीतील भेटीनंतर मंत्रीपदाची नाव निश्चित होण्याची दाट शक्यता आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *