निवडणुकीत फुटलेल्या काँग्रेस आमदारांवर पक्षाकडून कारवाईचा बडगा

Action taken by the party against the Congress MLAs who split in the elections

 

 

 

 

 

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीची हाती आले आहेत. या निवडणुकीत महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवारी निवडून आले आहेत.

 

 

 

शिवाय, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. कारण काँग्रेसची 8 मतं फुटली आहेत. या मतांची फायदा महायुतीला झालाय.

 

 

 

तर मविआचे उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, काँग्रेसची मतं फुटल्यानंतर

 

 

 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चांगलेच संतापले आहेत फुटलेल्या मतांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही जी रणनीती ठरवली होती त्यानुसार आमचे तीन उमेदवार निवडून यायला हवे होते, पण आम्ही आकडेवारी पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आले की काँग्रेसची मतं ही निश्चित फुटली आहेत.

 

 

 

 

ज्यांनी मत महाविकास आघाडीला दिली नाही, अशा काँग्रेस आमदारांची नावे आम्ही हाय कमांडला पाठवली आहेत. या आमदारांवर लवकरच हाय कमांडकडून कारवाई केली जाईल.

 

 

 

अपक्षांचा उपयोग महाविकास आघाडीला झाला नाही यासंदर्भात मी कोणती कमेंट करणार नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं.

 

 

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 4 राजकीय पक्षांना आमदारांची मतं फुटू नयेत, यासाठी काळजी घेतली होती. अजित पवारांची राष्ट्रवादी,

 

 

भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता.

 

 

मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले नव्हते. पक्षात एकजूट दाखवली नाही, त्यामुळेच काँग्रेसची अनेक मतं फुटली आहेत, असं राजकीय विश्लेषकांचे मतं आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *