नाराज तानाजी सावंत यांनी फेसबुकचा डीपी वरून शिवसेना नाव अन् चिन्हच हटवले

Angry Tanaji Sawant removes Shiv Sena name and symbol from Facebook DP

 

 

 

शिवसेना पक्षातील पहिल्या फळीतील नेते असलेल्या आमदार तानाजी सावंत यांना मंत्रि‍पदाची संधी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत.

 

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार शिवसेना शिंदे गटाच्या 11 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यामध्ये, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

 

मात्र, शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेते व शिंदे सरकारमधील तीन मंत्र्‍यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनाही मंत्रीपद देण्यात आले नाही.

 

त्यामुळे, तानाजी सावंत नाराज असून त्यांनी माध्यमांशी बोलण्याचंही टाळलं आहे. याबाबत, त्यांच्या कार्यालयाकडून माध्यमांसाठी पत्रकही जारी करण्यात आलं होतं.

 

आता, तानाजी सावंत यांनी त्यांच्या फेसबुकचा प्रोफाईल फोटो बदलल्याने चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे सावंत यांनी आपल्या प्रोफाईलमधील शिवसेना हे नाव काढलं आहे.

 

महायुतीच्या फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी हुकलेल्या तानाजी सावंत यांनी सोशल मीडियाववरील प्रोफाइल बदलला असून शिवसेनेचं नाव आणि चिन्ह असलेलं प्रोफाइल सावंत यांनी हटवलं आहे.

 

त्याऐवजी, नवीन प्रोफाईल ठेवण्यात आलं असून या नव्या प्रोफाईल फोटोमध्ये फक्त शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसून येत आहे.

 

तसेच, शिवसेना चिन्ह असलेल्या फोटोच्या जागी शिवसैनिक उल्लेख असलेला बाळासाहेबांचा फोटो लावल्याचे पाहायला मिळते. तानाजी सावंत यांनी फोटो बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

दुसरीकडे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून या अधिवेशनाकडेही सावंत यांनी पाठ फिरवली आहे. तसेच, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यालाही ते अनुपस्थितीत होते.

 

नागपूरमधील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्येच त्यांनी आपली बॅग पॅक केल्याचं काल दिसून आलं. त्यामुळे, तानाजी सावंत हे मंत्रि‍पदाचे दावेदार असतानाही त्यांना संधी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान परंडा येथील मतदारसंघात घेतलेल्या जाहीर सभेत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना ‘तुम्ही आमदार करा, मी नामदार करतो’ अशी घोषणा केली होती.

 

आता शिंदे यांनी दिलेला शब्द पाळावा अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डावल्यामुळे त्यांच्या समर्थकानी परांडा इथं आक्रमक होत घोषणाबाजी केली.

 

तसेच एकनाथ शिंदे यांनी फेरविचार करत सावंत यांना पुन्हा एकदा आरोग्यमंत्री करावे अशी मागणीही समर्थकांनी केली आहे.

 

धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री कैसा हो, आमदार तानाजी सावंत जैसा हो’, तानाजी सावंत आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्या.

 

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्याला मंत्रि‍पदाचा दुष्काळ लागल्याचे दिसून आले. कारण,

 

या दोन्ही जिल्ह्यातून एकाही नेत्याला फडणवीस सरकारमध्ये मंत्रि‍पदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे, आता पुढील अडीच वर्षे या दोन जिल्ह्यांची मंत्रि‍पदाची तहान भागणार की नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *