आघाडीत शरद पवारांनी केला या 8 लोकसभा मतदारसंघावर दावा

Sharad Pawar in the front claimed these 8 Lok Sabha constituencies

 

 

 

 

राज्यातील सत्ताधारी आघाडीविरोधातील नाराजी हा लोकसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी जिथे जिंकण्याची शक्यता तिथे त्या पक्षाला संधी हे महाविकास आघाडीचे धोरण ठरले आहे.

 

 

 

जागावाटप चर्चांना अद्याप प्रारंभ झाला नसला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने लोकसभा मतदारसंघात निर्णायक ताकद असल्याचा निष्कर्ष काढला असून या जागांबाबत आग्रही भूमिका घेतली जाणार आहे.

 

 

 

काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अत्यंत सकारात्मक वातावरण आहे. तेथे पक्षाला यश मिळू शकेल अशी चिन्हे आहेत. पक्षाची ताकद पुन्हा अजमावून पाहण्यात येणार आहे.

 

 

 

असे निरीक्षकांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाचा निकाल कसाही असला तरी शरद पवार यांच्याबाबत सहानुभूती निवडणुकीचे चित्र बदलवणारी ठरेल, असे एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे.

 

 

 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. कारण महाविकास आघाडीकडं पवारांनी

 

 

८ मतदारसंघांवर दावा सांगितला आहे. तसेच या मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

 

 

 

जळगाव, दिंडोरी, रामटेक, माढा, अमरावती, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा या आठ मतदारसंघावर शरद पवार यांनी दावा केला आहे. या मतदारसंघात शरद पवार गटाची ताकद असल्याचं सांगितलं जात आहे.

 

 

 

मात्र, महाविकास आघाडीत शरद पवार गटाला 8 जागा मिळणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या

 

 

 

शिवसेनेकडून विद्यमान खासदारांच्या आधारे सर्वाधिक जागा मागण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसही यात वेगळ्या जागांसाठी आग्रही असणार आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *