संसदेत घुसलेल्या दोन अज्ञातांपैकी एक मराठवाड्याचा ;पोलिसांनी केली अटक

One of the two unknown people who broke into Parliament was arrested by the police from Marathwada ​

 

 

 

 

प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन सुरक्षा भेदल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उडी मारल्याने भर लोकसभेत एकच हल्लकल्लोळ माजला.

 

 

त्याचदरम्यान लोकसभेबाहेर कलर स्मोक अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन आंदोलन केल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यापैकी एक जण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातला आहे.

 

 

लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. यामध्ये नीलम कौर सिंह ही 42 वर्षीय महिला हिस्सार हरियाणातील आहे. तर 25 वर्षीय अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

 

 

 

हे दोन्हीही आरोपी दिल्लीतील संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन इथे आंदोलन करत होते. या दोघांकडे कलर स्मोक होते. त्यामुळे नीलम कौर सिंह आणि अमोल शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलं.

 

 

 

दरम्यान, अमोल धनराज शिंदे हा सुद्धा संसदेबाहेरील आंदोलनात सहभागी होता. ट्रान्सपोर्ट भवन इथे हे आंदोलन सुरु होतं.

 

 

 

त्यावेळी या आंदोलकांकडे कलर स्मोक अर्थात पिवळ्या रंगाच्या धुराच्या नळकांड्या सापडल्याने सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत, आंदोलकांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांपैकी एक अमोल शिंदे नावाच तरुण मूळचा लातूर जिल्ह्यातील आहे.

 

 

 

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. संसदेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात इसम सभागृहात शिरले.

 

 

प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात आले. सुरक्षा व्यवस्था भेदून दोन जण सभागृहात शिरले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते.

 

 

यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या तिघांना पकडण्यास सांगितलं. काही खासदार या तिघांना पकडण्यासाठी धावले. दरम्यान, पिठासीन राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली आहे.

 

 

 

हा गोंधळ पाहून सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले. ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंतही बाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

 

 

यावेळी सावंत यांनी सभागृहात घडलेल्या घटनेची माहिती दिली. सावंत म्हणाले, लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोनजण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले.

 

 

एका खांबाच्या मदतीने ते खाली प्रेक्षक गॅलरीतून आले. दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते.

 

 

 

तेवढ्यात त्यातल्या एकाने बूट काढले, तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या इसमालाही पकडलं.

 

 

 

त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला. पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता. तो गॅस कसा आला ते माहिती नाही. पण या गॅसमुळे नाकाला आणि डोळ्यांना त्रास होत होता. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आहे.

 

 

 

खासदार दानिश अली म्हणाले, “तानाशाही नहीं चलेगी” (हुकूमशाही चालणार नाही) अशा घोषणा हे दोघे देत होते. प्राथमिक माहितीनुसार म्हैसूरचे कोणीतरी खासदार आहेत त्यांच्या पासवर हे दोघे प्रेक्षक गॅलरीपर्यंत आले होते. या खासदाराला चौकशीसाठी बोलावलं आहे.

 

 

 

हे दोन जण सभागृहात धावत असताना खासदारांनी त्यांना पकडलं. त्याआधी या दोघांनी बूटातून काहीतरी काढलं आणि सभागृहात धूर पसरू लागला.

 

 

या दोघांना पकडल्यानंतर खासदारांनी दोघांनाही चोप दिला. त्यापैकी एकाचं नाव सागर असं सांगितलं जात आहे. म्हैसूरचे खासदार प्रतापराव सिंह यांच्या मदतीने या दोघांनी प्रेक्षक सभागृहाचा पास (परवाना) बनवून घेतला होता.

 

 

दरम्यान, सभागृहात हा प्रकार सुरू असताना संसदेच्या बाहेर एक महिला घोषणा देत होती. या महिलेलालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

 

 

२००१ साली आजच्याच दिवशी भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे अनेक खासदारांनी आजच्या घटनेलाही संसदेवरचा हल्ला म्हटलं आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *