चोरट्यांनी चक्क फोडले बँकेचे लॉकर, पैसे, सोने केले लंपास
Thieves broke into a bank locker, looted money and gold
इंडियन ओव्हरसीज बँकेत मोठी चोरीची घटना उघडकीस आली. यानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. चोरट्यांनी तब्बल 42 लॉकर फोडून पैसे, सोने आणि काही कागदपत्रांची चोरी केली.
ही घटना लखनऊच्या गोमतीनगर येथील इंडियन ओव्हरसीज बँकेत घडली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
तपास करत पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केले. यावेळी पोलिसांमध्ये आणि आरोपींमध्ये चकमक झाली असता दोन हल्लेखोरांचा मृत्यू झाला.
बिहारमधील रहिवासी असलेला गुन्हेगार सनीदयाल आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. सोमवारी रात्री उशिरा दुसरा गुन्हेगार सोविंद कुमार याचा एन्काउंटर झाला. त्यांच्यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते.
मंगळवारी सकाळी त्याचाही मृत्यू झाला. बँकेतील चोरीची घटना सात जणांनी मिळून केली होती. आता त्यापैकीच दोघांचा मृत्यू झाला आहे. अजून इतरांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.
रिपोर्टनुसार, सनीदयाल याच्याकडे एक पिस्तूल, जिवंत काडतुसे, बँकेतून चोरलेले काही दागिने आणि रोख 35500 रुपये पोलिसांना सापडले. 22 डिसेंबर रोजी इंडियन ओव्हरसीज बँकेतून कोट्यवधींचे दागिने
आणि इतर वस्तू चोरून चोरट्यांनी पलायन केले होते. हे चोरटे 2 तास बँकेत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन ओव्हरसीज बँकेची भिंत कापून चार चोरटे बँकेच्या लॉकरपर्यंत पोहोचले होते. तीन जण बाहेर थांबून सर्व हालचालीवर लक्ष ठेऊन होते.
इलेक्ट्रिक कटरने 42 लॉकर कापून कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि कागदपत्रे लुटून नेली. रविवारी चोरट्यांनी हा गुन्हा केला. बँकेच्या शेजारी असलेल्या एका बंद फ्लॅटची भिंत चोरट्यांनी कापली होती.
बँकेत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरीचा सर्व प्रकार कैद झाला. यानंतर पोलिसांनी आपली सुत्रे हलवली. डीसीपी शशांक सिंह यांनी सांगितले की, चोरांना पकडण्यासाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेसह 8 पथके तयार करण्यात आली आहेत.
लवकरच सर्व गुन्हेगार आमच्या ताब्यात असतील. याप्रकरणी पुढील काही दिवसांमध्ये अजून काही मोठे खुलासे हे पोलिसांकडून केली जाऊ शकतात, असे सांगितले जातंय.