बीड हत्याकांडातील 3 फरार आरोपींची हत्या झाल्याचा दमानियांचा खळबळजनक दावा
Damania's sensational claim that 3 absconding accused in Beed massacre were killed
जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आता सीआयडीकडून वेगवान तपास सुरू असून मुख्यमंत्र्यांनी फरार आरोपींसंदर्भात महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
बीड हत्याकांडामधील फरार आरोपींच्या संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी
आरोपींच्या अटकेची मागणी करत हे प्रकरण लावून धरलं आहे. तसेच, मंत्री धनजंय मुंडेंचा राजीनामा व वाल्मिक कराडला अटक करावी, अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे.
दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी खळबळजनक दावा केला होता. याप्रकरणातील फरार 3 आरोपींची हत्या करण्यात आल्याचे त्यांनी एका कथित ऑडिओ क्लीपचा संदर्भ देत सांगितले होते. मात्र, याबाबत आता पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे.
बीड सरपंच हत्याकांडातील फरार आरोपींच्या मृत्युसंदर्भात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलेला दावा फोल ठरला आहे. एका व्हॉइस मेसेजचा हवाला देत अंजली दमानिया यांनी
फरार आरोपींचा मृत्यू झाल्याचा केला होता दावा. मात्र, बसवकल्याण येथे असा कोणताही प्रकार घडल्या नसल्याची माहिती बीड पोलिसांनी दिली.
ज्या इसमाने अंजली दमानिया यांना तो व्हॉईस मेसेज पाठवला, त्याने दारुच्या नशेत तो मेसेज पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान अशा प्रकारची कोणतीही माहिती असल्यास प्रथम पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन देखील बीड पोलिसांनी केले आहे. तसेच आरोपीचा शोधकार्यास अडथळा
किंवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशा प्रकारची माहिती किंवा कॉमेंट करू नये अशा सूचनादेखील पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
म्हसाजोग ता.केज,जि.बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्ते प्रकरणात अंजली दमानिया यांना त्यांचे भ्रमणध्वनीवर व्हाईस मेसेस मध्ये बश्वेश्वर कल्याणला तीन डेथ बॉडया सापडल्या आहेत ती खात्रीलयक माहिती नाही
आपण ओपन नाही करायच अशा मजकूराची व्हाईज मेसेसची बीड पोलीस दलाने खात्री केली असता असा काहीएक प्रकार घडलेला नसून, ज्या इसमाने अंजली दमानिया यांना व्हाईस मेसेज पाठविला
त्याने दारुच्या नेशेमध्ये असे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, कृपया अशी कोणतीही माहिती असल्यास आपण प्रथम पोलिसांशी संपर्क करावा
आरोपीचे शोध कार्यास अडथळा अथवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारची माहिती कॉमेंट किंवा वक्तव्य करू नये.
काही उपयुक्त माहिती असल्यास बीड पोलीसांना कळवून तपास कार्यास सहकार्य करावे, असे बीड पोलीस दल नागरिकांना अवाहन करीत आहे.