नववर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी नवसंकल्प करावा;भावनाताई नखाते

Students should make new resolutions on the occasion of the New Year*- Mrs. Bhavanatai Nakhate

 

पाथरी: विठ्ठल प्रधान

 

येणारा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा काळ असणार आहे, त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यां पुढील आवाहने ही बदलत आहेत म्हणूनच विद्यार्थ्यांनी

 

काळानुरूप ज्ञानार्जनाचा नववर्षानिमित्त संकल्प करावा असे प्रतिपादन भावनाताई नखाते यांनी केले.

1 जानेवारी 2025 बुधवार रोजी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे नववर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी त्या अध्यक्षीयस्थानावरून बोलत होत्या.

 

याप्रसंगी वाल्मीकेश्वर ऍग्रो इंडस्ट्रीज देवनांद्रा ता. पाथरी चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य नखाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

मु.अ.एन.ई.यादव, उप मु.अ.आर. जे. गुंडेकर, एन.एस.जाधव, श्रीमती कमल कांबळे, श्रीमती जयश्री शिंदे, श्रीमती सविता पतंगे आदी उपस्थित होते.

 

प्राचार्य के एन डहाळे व सुंदराव कुटे यांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. शुभांगी तोंडे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रतीक्षा मुंडे यांनी केले.

कार्यक्रमास विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *