बजेट इफ्फेक्ट ;’या’ गोष्टी होणार आता स्वस्त

Budget effect; 'These' things will now be cheaper

 

 

 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी अनेक मोठ्या घोषणा यावेळी केल्या आहेत. शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने या अर्थसंकल्पातून केलाय.

 

यासोबतच अनेक गोष्टी स्वस्त करण्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केलीये. सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. भारतात तयार होणारे कपडे

 

आता स्वस्त होणार आहेत. यासोबतच मोबाईल फोनही स्वस्त दरात मिळणार आहेत. निर्मला सीतारामन या आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत.

 

आज 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. निर्मला सीतारामन यांचा हा आठवा अर्थसंकल्प असेल. निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात करत असतानाच

 

विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. यासोबतच अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगोदरच विरोधकांनी सभात्याग केला. अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या आहेत.

 

काय होणार स्वस्त

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली केली, मोबाईल फोन स्वस्त होणार, चामड्यांच्या वस्तू स्वस्त होणार, इलेक्ट्रॉनिक वाहन स्वस्त होणार, टीव्ही स्वस्त होणार, भारतात बनणारे कपडे स्वस्त होणार,

 

टीव्ही, वैद्यकीय उपकरणे स्वस्त होणार आहेत. मरीन प्रॉडक्टवरील ड्युटी हटवली आहे. टीव्हीचे देशांअंतर्गत पार्टस स्वस्त होणार, ईव्हीचे इंजिन बनवण्यासाठी आवश्यक माल स्वस्त होणार आहे.

 

यासोबतच बूट, लेदर जॅकेट, बेल्ट, पर्स स्वस्त होणार आहेत. या घोषणा करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. निर्मला सीतारामन यांनी टॅक्सबद्दल अत्यंत मोठी घोषणा केलीये.

 

 

अलीकडे, इंटरएक्टिव्ह फ्लॅट पॅनेल डिस्प्लेवरील मूळ कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आली आहे. एलईडी टीव्ही देखील महागणार आहेत.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा ‘भारत ट्रेड नेट’ (BTN) ची स्थापना केली जाईल,

 

BTN ची रचना आंतरराष्ट्रीय पद्धतींनुसार केली जाईल. व्यापारासाठी ही मोठी घोषणार असणार आहे. विकसित भारतासाठी अणुऊर्जा मिशनची घोषणा करण्यात आली आहे.

 

2047 पर्यंत किमान 100 GW अणुऊर्जेचा विकास आवश्यक आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खाजगी क्षेत्रांचा सक्रिय सहभाग सक्षम करण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आलीये.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *