शिंदेंची एंट्री, समोर उद्धव ठाकरे कुटुंब ‘दिसताच , भाईंच्या चेहऱ्यावरील भाव बदलले

Shinde's entry, as soon as Uddhav Thackeray's family appeared in front, the expression on the brothers' faces changed

 

 

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केलेला सत्कार आणि त्यावेळी त्यांच्याबद्दल काढलेले कौतुकोद्गार यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.

 

यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेनं संताप व्यक्त करत शरद पवारांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्या. खासदार संजय राऊतांनी केलेल्या टिकेला पवारांच्या पक्षाकडून प्रत्युत्तर मिळालं. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. यानंतर आता शिंदेंचा आणखी किस्सा चर्चेत आहे.

 

एमसीएचआयकडून सध्या ठाण्यात मालमत्ता प्रदर्शन सुरु आहे. त्याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. शिंदे यांची एंट्री झाली त्यावेळी सभागृहात चित्रफित सुरु होती.

 

‘जनांसाठी राब राबतो.. अनाथांचा नाथ एकनाथ…’ अशी शब्दरचना असलेलं गाणं सुरु होतं. ही चित्रफित एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत उठाव करण्यापूर्वीची होती. त्यामुळे त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दिसत होते.

एकनाथ शिंदे सभागृहात येताच स्क्रीनवर त्यांना उद्धव ठाकरे दिसले. जुनं दृश्य पाहताच शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले. त्यानंतर एका क्षणातच ती क्लिप बंद करण्यात आली.

 

क्रेडाई आणि एमसीएचआयकडून ठाण्यात मालमत्ता प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन ४ दिवस सुरु राहणार आहे. घर खरेदीच्या इच्छा असणाऱ्यांना विविध पर्याय एकाच जागी पाहता यावेत या उद्देशानं मालमत्ता प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

ठाण्याचं रुपडं वेगानं बदलत असल्यानं अनेक जण घरकुलासाठी ठाण्याला पसंती देत असल्याचं एकनाथ शिंदे उद्घाटन समारंभावेळी म्हणाले. ‘मोठे पायाभूत प्रकल्प होत असल्यानं रस्त्यांचं जाळं तयार झालं.

 

वाहतुकीच्या सुविधा वाढल्या आहेत. या मालमत्ता प्रदर्शनाचं यंदाचं २२ वं वर्ष आहे. पहिल्या प्रदर्शनापासून मी या कार्यक्रमाला येतो. या मालमत्ता प्रदर्शनाच्या वाढीत ठाण्यातील रिअल एस्टेटचं प्रतिबिंब दिसतं,’ असं शिंदे यावेळी म्हणाले.

क्रेडाई-एमसीएचआयच्या मालमत्ता प्रदर्शनात महिला खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिला खरेदीदारांनी फ्लॅटच्या एकूण किमतीच्या २० टक्के रक्कम भरल्यास त्यांना विशेष सवलत देण्यात येणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *