सामाजिक कार्यकर्त्याचा गौप्यस्फोट, त्या भेटीत मुंडे ,कराडला वाचवण्याची चर्चा
Social activist's secret revelation, Munde, Karad discussed saving them in that meeting
![](https://kharadarpan.com/wp-content/uploads/2025/01/dhas.jpg)
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वादळ निर्माण झाले आहे. मनोज जरांगे पाटील, अंजली दामानिया यांच्यासह विविध राजकीय पक्षांकडून सुरेश धस यांचा समाचार घेतला जात आहे.
त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी मोठा आरोप केला आहे. धनंजय मुंडे आणि तृप्ती देसाई यांची भेट तीन-चार तास झाली आहे.
म्हणजे त्या भेटीत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याला वाचवण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता आहे, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला.
तृप्ती देसाई म्हणाल्या, तुम्ही तीन-चार तास चर्चा केली. म्हणजे त्या भेटीत प्रकृतीची चौकशी हा विषय नाही. त्यात मुंडे आणि कराड याला वाचवण्यावर चर्चा झाली असेल.
तुम्ही आता वाल्मिक कराड याला भेटण्यासाठी कारागृहात जावू शकतात. कारण वाल्मिक कराड यालाही आजार आहे. मग त्यानंतर त्याच्या प्रकृतीची चौकशी करायला गेलो होते, असे सांगाल. एवढा निर्लज्जपणा सत्ताधारी आमदाराने करु नये, असा टोला तृप्ती देसाई यांनी लगावला.
तृप्ती देसई म्हणाल्या, सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना भेटायला नको होते. ते आतापर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागत नव्हते ते आता स्पष्ट झाले आहे.
मंत्रिपद मिळवण्यासाठी तुम्ही हे सगळे केले का ? जनतेचा विश्वासघात सुरेश धस यांनी केला आहे. सुरेश धसा यांना हे प्रकरण मिटवायचे होत का ?
असा सवाल तृप्ती देसाई यांनी केला. पण आम्ही हे प्रकरण सोडणार नाही. मी धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांची जाऊन भेट घेणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी म्हटले.
भाजपा आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी झाली. या भेटीविषयी सुरेश धस यांनी वेगळा सूर आळवला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी जेवण्यासाठी दोघांना बोलावण्यात आले. या दोघांमध्ये चार तास चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या भेटीनंतर आता धसांवर चौफेर टीका होत आहे.
या भेटीविषयी बावनकुळे यांनी बाजू मांडली. सुरेश धस यांनी काही मुद्दे मांडले आहेत ते सरकारकडे मांडले आहे. आरोपींना सजा होत नाही, त्यांची भावना आहे.
सर्व आरोपींना फाशीपर्यंत नेणं ही भूमिका त्यांनी मांडली आहे. या भूमिकेच्या पाठिशी पक्ष उभा आहे. पण हे करत असताना महायुतीतील नेते आहेत त्यांच्यासोबत व्यक्तिगत वाद नको. मतभेद जरुर असावे मनभेद नसावेत असे बावनकुळे म्हणाले.
दोघांना एकाच ठिकाणी बोलवण्यात आले असले तरी आपल्याला मुंडे येणार हे माहिती नव्हते, असे धस म्हणाले. तर विरोधकांनी आता हा सर्व प्रकार मुंडे यांना वाचवण्यासाठी सुरू असल्याचा आरोप केला आहे.
त्यातच धस यांच्यावर आगपाखड होत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेकांनी या भेटीवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. तर दुसरीकडे धनुभाऊंची यावर अजून प्रतिक्रिया आलेली नाही.