मनोज जरांगे यांनी घेतला सुरेश धस यांच्याबाबत मोठा निर्णय
Manoj Jarange takes a big decision regarding Suresh Dhas

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोपाचा धुरळा उडवणारे भाजप आमदार सुरेश धस आता राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे
यांच्या गुप्त भेटीमुळे अडचणीत सापडले आहे. सुरेश धसांच्या या खेळीमुळे मनोज जरांगे कमालीचे संतापले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांना भेटच नाकारली आहे.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दोन दिवसांपूर्वी ज्यांच्यावर आरोपाचे वार केले, त्याच राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली.
धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी जाऊन सुरेश धस यांनी भेट घेतल्याचं उघड होताच सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सुरेश धस यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.
त्यानंतर ते मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. पण मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांना भेट नाकारली आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटीवर मनोज जरांगे कमालीचे नाराज झाले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी या मुद्द्यावरून सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘हे तर नवीन ऐकालाच मिळालं आहे, अवघड आहे. हे धक्कादायक आहे. गोरगरिब समाज न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
एखाद्याकडून अपेक्षा करतोय, फालतूचं राजकारण व्हावं, हे अपेक्षित नाही. गोरगरिबांचं घर उन्हात पडलं आहे. हे बरोबर नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे.
धसांच्या विश्वासार्हतेला तडा केला, धसांवर राजकीय दबाव आला असेल. सुरेश धसांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांचं त्यांना लखलाभ.
काय काय घडलं ते सगळं जनतेला सांगतील. परिस्थिती अशी आहे, सुरेश धस यांनी हे टाळायला हवं होतं’ असं म्हणत मनोज जरांगे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
मनोज दादा हे आमचे दैवत आहे, ते काही बोलले असतील. रागावले असतील पण मी त्यांच्याशी बोलून घेईन. त्यांची नाराजी दूर करेल, असं सुरेश धस म्हणाले.
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध दंड थोपटले असताना दुसरीकडे दोघांमध्ये गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली होती.
त्यावर बोलताना सुरेश धस यांनी आपण माघार घेणार नसल्याचं सांगितलं. त्यावेळी त्यांनी बातमी बाहेर कशी आली? असा सवाल करत सुरेश धस यांनी सुचक इशारा दिला आहे. त्यामुळे आता बीडच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहेबोलताना सुरेश धस यांनी मोठं वक्तव्य केलं.
बावनकुळे माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी मला जेवायला बोलवण्यावर मला जाणं भाग होतं, म्हणून मी तिथं गेलो. त्यानंतर धनंजय मुंडे तिथं आले. मी त्यांच्यासोबत अर्धा तास होतो.
मी निघून आलो. त्याआधी मी धनंजय मुंडे यांना भेटायला गेलो होतो, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. धनंजय मुंडे यांनी यावेळी मला संतोष देशमुख प्रकरणावर बोलण्याचा प्रयत्न केला. पण मी तडजोड करणार नाही असं मी स्पष्ट सांगितलं, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी माणुसकी सोडली. संतोष देशमुख हे भाजप आणि पंकजा ताईंचा एजन्ट होते. दोघंच भाऊ एजन्ट होते. माझ्या पक्षाचा बुथ प्रमुखासाठी मी बोलणार नाही का? असा सवाल देखील सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंच्या भेटीत काहीच झालं नाही, असंही सुरेश धस म्हणाले. या सर्व प्रकरणात कुणीतरी माईंडगेम खेळतंय. धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी बाहेर कशी आली? असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला.
बैठक 25 ते 30 दिवसांपूर्वीची होती. मग आता बातमी कशी बाहेर आली? मी माणुसकी म्हणून भेटायला गेलो. पण हे जे षडयंत्र आहे त्यावर मी मुख्यमंत्र्यांशी बोलेल. जे सगळं कोण करतंय ते माझ्या लक्षात आलं आहे,
असं म्हणत सुरेश धस यांनी इशाऱ्या इशाऱ्यात सगळंच सांगितलं. सुरेश धस यांनी बीडमधील एका मोठ्या नेत्यावर निशाणा साधत वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, माझ्याविरुद्ध कुणाच्या तरी मनात जेलसी आहे. मी त्याचं नाव मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. सुप्रिया ताई बोलल्या ते खरं आहे, मी मॅनेज होणारा नाही. म्हणून मी फाटका तुटका आहे. माझं मन साफ आहे, म्हणून मी थेट भूमिका घेतोय, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.