भाजप आमदाराची थेट कॅफेवर धाड

BJP MLA raids cafe

 

 

 

नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात एका कॅफेवर तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरु असल्याची माहिती मिळताच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी छापा टाकला.

 

त्यावेळी कॅफेमध्ये सुरु असलेले प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाच ते सहा प्रेमी युगुलांना ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सरकार वाडा पोलीस स्टेशन आणि गंगापूर रोड पोलीस स्टेशनच्या सीमा रेषेवर ‘अ’मोगलीज नावाचा कॅफे होता. गेल्या पाच वर्षापासून हा कॅफे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

 

या कॅफेमध्ये काही कंपार्टमेंट करण्यात आले होते. मुलं-मुली तिथे अश्लील चाळे करत असल्याची माहिती देवयानी फरांदे यांना मिळाली होती.

त्यानंतर देवयानी फरांदे यांनी या कॅफेवर धाड टाकली. यावेळी या कॅफेमध्ये तरुण-तरुणी अश्लील चाळे करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

 

यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि पाच ते सहा प्रेमी युगुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आले. त्यांची सध्या चौकशी केली जात आहे. तसेच त्यांच्या पालकांना पाचारण करून त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, नाशिक शहरात हे केवळ एकच ठिकाण नसून अनेक ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. मात्र याबाबत कारवाई होत नाही. त्यामुळे या कॅफेवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *