काँग्रेस नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश,संजय राऊत म्हणाले ’60 कोटींसाठी सर्वकाही

Congress leader joins Shinde Sena, Sanjay Raut says 'Everything for 60 crores'

 

 

 

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशावरुन आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊतांनी

 

या पक्षप्रवेशामागे धंगेकरांची पत्नी आणि त्यांच्यावर असलेल्या अटकेच्या तलावारीबरोबर 60 कोटी रुपयांचं कनेक्शन असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

“रवींद्र धंगेकर हे सुरुवातीला शिवसेना नंतर मनसे, पुढे काँग्रेस आणि काल ते शिंदेच्या गटात गेले. ते चांगले गृहस्थ आहेत. ते म्हणाले विकास काम होत नाहीत म्हणून तिकडे चाललो आहे.

 

असं कोणतं प्रपोजल दिलं आहे की समाज उपयोगी काम होत नाहीत म्हणून ते तिकडे गेले?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना राऊत यांनी,

 

“त्यांच्या पक्षात होणारे प्रवेश हे भीतीपोटी होत आहेत. एकनाथ शिंदे यांनी खुद्द भीतीने प्रवेश केला. कोणी प्रवेश करत नसाल तर त्याची आर्थिक कोंडी किंवा दबाव आणला जातो. धंगेकर यांनी त्यांच्या दैवताला स्मरून सांगावं की कशासाठी गेले” असंही म्हटलं.

 

संजय राऊतांनी धंगेकरांच्या शिवसेना पक्षप्रवेशामागे आर्थिक कारण असल्याचा दावा केला आहे. “कसबा मतदारसंघातील 60 कोटींची जागा आहे. ती जागा त्यांनी विकासासाठी ताब्यात घेतली.

 

ती जागा ‘वक्फ’ची आहे असं सांगून भाजपचे काही लोक कोर्टात गेले म्हणून ते काम थांबवलं. प्रतिभा धांगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार तयार करण्यात आली की त्यांनी पक्ष सोडावा,” असा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे.

 

पुढे धंगेकरांचे आर्थिक कनेक्शन सांगताना राऊतांनी,”त्यांचे दोन पार्टनर हे भाजपचे 2 माजी नगरसेवक आहेत. कोंडी करून त्यांना प्रवेश करायला लावला. यापूर्वी झालेले 90 टक्के प्रवेश असेच झाले.

 

रवींद्र वायकर यांनाही असच प्रवेश करायला लावला होता. लोकसभा निवडणुकीला धांगेकर उभे राहिले तेव्हापासून हा दबाव सुरू झाला. ती जागा त्यांच्या पत्नीच्या नावे आहे अशी माहिती आहे.

 

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना धंगेकरांनी, “10 वर्ष मी शिवसेनेत होतो. आता पुन्हा परिवारात काम करण्याची संधी मिळाली. एकनाथ शिंदे यांनी सर्वांना न्याय दिला.

 

सामंत यांनी इथंपर्यंत मला आणायचा प्रयत्न केला आहे. कुटुंबात पुन्हा आणण्यासाठी सामंत यांनी किती प्रयत्न केले हे मी पाहिले आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी आमच्यावर केलं तसं प्रेम पुणेकरांवर करावं. शिवसेनेच काम कमी होणार नाही याची ग्वाही देतो,” असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना धंगेकरांनी, “मी पुण्यात काँग्रेसचा नगरसेवक, आमदार होतो.

 

लोकसभाही लढवली. शिंदेंच्या कामाने प्रभावीत झालो. काँग्रेसमध्ये नाराजी नव्हती. माझावर तिथेही विश्वास दाखवला. त्यांचेही आभार मानतो. जिथे अन्याय दिसेल तिथे धंगेकर आहेच.

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बोलले ते योग्यच आहे, ‘काय होतास तू काय झालास तू,’ मी सर्वांचे आभार मानतो,” असं ही पक्षप्रवेशाच्या भाषणात म्हणाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *