विधानपरिषदेसाठी दादांनी आमदाराच्या नवऱ्यालाच दिले तिकीट ; एकाच घरात दोन आमदार

Dada gave ticket to MLA's husband for Legislative Council; Two MLAs in the same house

 

 

 

 

मुंबई: विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ मार्चला निवडणूक पार पडणार आहे. त्यापैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत, तर प्रत्येकी एक जागा ही शिवसेना आणि अजित पवार गटाला मिळाली आहे.

 

त्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकाच घरात पती-पत्नी आमदार पाहायला मिळणार आहेत.

 

अजित पवार यांचे निकटवर्तीय अमरावतीचे राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या पत्नी सुलभा खोडके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार आहेत. त्यामुळे आता हे पती-पत्नी वेगवेगळ्या पक्षातून आमदार पाहायला मिळतील.

 

पाच विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून तीन नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

तर, शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय खोडके यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.

 

अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. त्यांना उमेदवारी मिळणार असं बोललं जात होतं. मात्र, त्यांच्या नावाला पक्षांतर्गत प्रचंड विरोध होता.

 

त्यानंतर काही अजून नावही चर्चेत होती. मात्र, आता एक वेगळंच नाव समोर आलं आहे. संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त असल्याने त्यासाठी २७ मार्चला निवडणूक होणार आहे. त्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे.

 

विधानसभेवर निवडून गेलेल्या पाच विधान परिषद सदस्यांच्या राजीनाम्यामुळे या जागा रिक्त झाल्याने त्या जागांवर ही निवडणूक होत आहे.

 

त्यामध्ये भाजपच्या वाट्याला तीन तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे प्रत्येकी एक जागा आली आहे. या पाचही जागांसाठी आता उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *