अभिनेत्री जया बच्चन यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना सुनावले

Actress Jaya Bachchan told Deputy Chief Minister Shinde

 

 

 

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचल्याप्रकरणी सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे.

 

कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली आहे.

 

तसेच या संपूर्ण प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया देत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

 

दरम्यान, आता कुणाल कामराच्या गाण्यावरून सुरु असलेल्या वादावार सपाच्या खासदार जया बच्चन यांनी देखील भाष्य केलं आहे.

 

“तुम्ही शिवसेना तोडली तेव्हा बाळासाहेबांचा अपमान झाला नाही का?”, असा सवाल करत खासदार जया बच्चन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

 

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराच्या गाण्यावरून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सपा खासदार जया बच्चन यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला.

 

यावर बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, “अशा प्रकारे जर बोलण्यावर बंधन लावलं तर तुमचं काय होईल? तुम्ही वाईट परिस्थितीत आहात. तुमच्यावर बंधने आहेत.

 

तुम्हाला फक्त यावर बोलण्यास सांगितलं जाईल आणि दुसरे काहीही नाही, म्हणजे जया बच्चन यांची मुलाखत घेऊ नका. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही?

 

विरोधकांना मारहाण करणे, महिलांवरील बलात्काराच्या घटना, हत्येच्या घटना”, असं म्हणत खासदार जया बच्चन यांनी टीका केली.

 

तसेच स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने गाण्याच्या माध्यमातून शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केला असल्याचा आरोप शिवसेनेचे (शिंदे) नेते करत आहेत,

 

असा प्रश्न सपा जया बच्चन यांना माध्यामांच्या प्रतिनिधींनी विचारला. यावर उत्तर देताना जया बच्चन यांनी म्हटलं की, “तुम्ही (एकनाथ शिंदे) तुमचा खरा पक्ष सोडून सत्तेसाठी दुसऱ्या पक्षाबरोबर गेलात,

 

मग तुम्ही शिवसेना तोडली, तेव्हा बाळासाहेबांचा अपमान झाला नाही का?”, असा सवाल करत जया बच्चन यांनी जोरदार टीका केली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *