विरोधकांचा संताप,म्हणाले फसवे सरकार; दोनदा रद्द झालेले आरक्षण पुन्हा दिले…
Anger of the opposition, the so-called fraudulent government; Twice canceled reservation re-issued...
मराठा आरक्षणासाठी आज महत्वाचा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या कायद्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झाले. मात्र या विधेयकावरुन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सवाल उपस्थित केले आहेत. तसेच मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केल्याचा आरोपही सरकारवर केला आहे.
“आम्ही एक पत्र अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना दिले होते त्या प्रश्नाचा खुलासा करावा असे सांगितले होते पण त्यांनी ते केले नाही. यापूर्वी असे आरक्षण दिलेले होते ते रद्द झाले.
पुन्हा मराठा सामाजाची फसगत केली आहे. हे १० टक्के आरक्षण देताना आधार कुठला हे सांगितले नाही. हे कायद्याच्या आधारे टिकणारे नाही, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
“फडणवीसांच्या काळात जशी केवळ निवडणूक काढून घेतले होती तशीच आता निवडणूक काढून घेतली जात आहे. जे बॅनर आधीच लावले होते.
हे जर मराठा समाजाला पटल तर ते बॅनर राहतील. नाही तर राहणार नाहीत. परिपत्रकानंतर गुलाल उधळले गेले. दोनदा रद्द झालेले आरक्षन पुन्हा दिले.
आम्ही बोलायला गेले तर बोलू दिले नाही. फसगत करणारे फसवे सरकार आहे,” असे आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केले आहेत.
“मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी आधी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनाने राज्य मागासवर्ग आयोग गठित करून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे,
ही मागणी घेऊन मी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. शासनाने ही मागणी मान्य करत मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करून मराठा समाजास आरक्षण लागू केले,
याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्य सरकारचे विशेष आभार व कौतुक,” अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजेंनी दिली आहे.