शरद पवार यांना माढ्यात मोठा झटका ,भाकरी फिरली

Sharad Pawar suffers a major setback, his fortunes turned upside down

 

 

 

लोकसभेच्या विजयानंतर महायुतीला सोडून महाविकास आघाडीत गेलेले अनेक नेते आता परत घर वापसी करू लागल्याचं पहायला मिळत आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातील संजय बाबा कोकाटे यांनी शरद पवार गटाचा राजीनामा देत आज शिंदे सेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. संजय बाबा कोकाटे हे लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते.

 

यामुळे पवार गटाला माढा विधानसभा जिंकण्यात मोठी मदत झाली होती. मात्र, आता संजय बाबा कोकाटे यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

पक्षांतर्गत गटबाजी आणि पक्ष संघटनेतील निष्क्रियतेला वैतागून संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यत्वपदाचा राजीनामा पक्षाध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे.

 

आज ते मुंबई येथील मुक्तगिरी बंगल्यावर संध्याकाळी सहा वाजता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

 

संजय कोकाटे यांच्या जाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात असून माढा विधानसभेसह माढा लोकसभेत संजय कोकाटे यांची मोठी ताकद आहे.

 

संजय कोकाटे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुंबईतील वरळी येथील एमएमआरडीएच्या विश्रामगृहात दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.

 

येत्या 15 दिवसांत संजय कोकाटे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची कुणकून लागली होती. कोकाटे यांनी 2019 मध्ये झालेली माढा विधानसभेची निवडणूक शिवसेना पक्षाकडून लढविली होती.या निवडणुकीत त्यांना 75 हजार मते मिळविली होती.

 

दरम्यान, संजय कोकाटे अकलूजच्या मोहिते-पाटील यांच्या भूमिकेवर नाराज आहेत. मोहिते पाटील कुटुंबाने माढा विधानसभेसाठी पुढे केलेल्या शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाला कोकाटे यांचा विरोध होता. अभिजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही अनेक दिवस कोकाटे निवडणुकीपासून लांब होते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *