नाना पटोलेंच्या विरोधात भाजप RSS चा शिलेदार नवा चेहरा

Shiledar new face of BJP RSS against Nana Patole

 

 

 

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विरोधात साकोली विधानसभा क्षेत्रातून भाजप उमेदवार कोणासोबत चर्चा सुरू असतानाच भाजप नाना पटोले विरोधात नवा आणि संघ स्वंयसेवक असलेला चेहरा उतरवण्याची शक्यता आहे.

 

संघाच्या विदेश विभागाचे माजी सहकार्यवाह आणि भाजप कार्यकर्ते डॅा. सोमदत्त करंजेकर यांनी साकोलीत नाना पटोले विरोधात तयारी सुरु केली आहे.

 

साकोली मतदारसंघात नाना पटोले अपेक्षित विकास करु शकलेले नाही.तर उद्योगांची घोषणा झाली, त्यांची सुरुवात नाना पटोले करू शकले नाही असा सोमदत्त करंजेकर यांचा आरोप आहे.

 

विधानसभा निवडणुकींचा शंखनाद कधीही होण्याची शक्यता आहे. साकोली तालुक्यातील सुकळी हे विद्यमान काँग्रेस नेते नाना पटोले यांचे मुख्य गाव असून याच मतदार संघातून नाना पटोले यांनी विविध पक्षातून उमेदवारी लढवली

 

आणि त्यात त्यांना यश देखील आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात साकोली विधानसभा क्षेत्रातून भाजप उमेदवार कोण अशी चर्चा सुरू असताना भाजप नाना पटोले विरोधात नवा

 

आणि संघ स्वंयसेवक असलेला चेहरा उतरवण्याची शक्यता आहे. संघाच्या विदेश विभागाचे माजी सहकार्यवाह आणि भाजप कार्यकर्ते डॅा. सोमदत्त करंजेकर यांनी साकोलीत नाना पटोले विरोधात तयारी सुरु केली आहे.

 

भाजप कार्यकर्ते डॅा. सोमदत्त करंजेकर कुटुंबाच्या साकोली मतदारसंघात 16 शिक्षणसंस्था असून ते परिसरात तेली समाजाचा नावाजलेला चेहरा आहे. साकोली मतदारसंघात नाना पटोले अपेक्षित विकास करु शकलेले नाही.

 

नाना पटोले एवढे वर्ष राजकारणात असून महत्वाच्या पदावर असून ही मतदारसंघात रोजगार आणू शकले नाही. व्हिजनच्या अभावी ते मोठे उद्योग आणू शकले नाही,

 

ज्या उद्योगांची घोषणा झाली, त्यांची सुरुवात नाना पटोले करू शकले नाही असा सोमदत्त करंजेकर यांचा आरोप आहे. पक्षाने संधी दिली तर नक्कीच नाना पटोले विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरून टक्कर देणार असे करंजेकर म्हणाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *