मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा;अर्थसंकल्पात लावलेला ‘कर घेतला मागे
Chief Minister Fadnavis' announcement; 'Taxes' introduced in the budget have been withdrawn

राज्याच्या अर्थसंकल्पात काही गोष्टींवर कर लावण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत मोठी घोषणा केली आहे.
इलेक्ट्रिक व्हेईकलवर या अर्थसंकल्पात कर लावण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता EV वाहनावरील वाढवलेला 7 टक्के टॅक्स मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत माहिती देतील असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
आज विधान परिषदेत इलेक्ट्रीव्ह व्हेईकलच्या मुद्यावरून चर्चा सुरू होती. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यातील सर्वच मंत्र्यांच्या आणि सरकारी कार्यालयाच्या गाड्याही इलेक्ट्रिक असणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, आपण इलेक्ट्रिक व्हेईकलवर याआधी टॅक्स लावला नाही. 30 लाखांपर्यंतच्या गाड्यांना टॅक्स नव्हता. या कारवर कर लावण्याची घोषणा करण्यात आली होती.
मात्र, इतक्या किंमतीची ईव्ही कार घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्याशिवाय, या किंमतीच्या ईव्ही कारवर लावण्यात आलेल्या फारसा कर महसूल जमा होणार नाही.
त्यामुळे हा वाढीव कर मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. शासनाची आणि सर्व मंत्र्यांची वाहने इलेक्ट्रिक असतील, अशी घोषणाही त्यांनी केली.
आमदार मनिष कायंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शक्य असेल त्या त्या-त्या शासकीय कार्यालयांमध्ये
ईव्ही कारचा वापर करण्यात येईल. त्याशिवाय, आमदारांना कार खरेदीसाठी देण्यात येणार कर्ज हे आता केवळ इलेक्ट्रिक गाड्यांसाठीच असेल, असेही फडणवीसांनी सांगितले.