छगन भुजबळांनी दिला फडणवीस सरकारला इशारा

Chhagan Bhujbal warns Fadnavis government

 

 

 

सुप्रिया सुळे यांनी आपल्या मतदारसंघातील 600 मीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी काल पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल सात तास उपोषण केलं.

 

त्यानंतर आता महात्मा फुले वाड्याच्या रखडलेला कामाच्या निमित्ताने सत्ताधारी पक्षातील छगन भुजबळ यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

महात्मा फुले वाड्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी छगन भुजबळ पुण्यामध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला भुजबळ म्हणाले, जेव्हा पासून महात्मा फुलेवाडा वाडा देशाला अर्पण करण्यात आला आहे.

 

तेव्हा पासून आणि त्यापूर्वी पासून अनेक लोक याठिकाणी येतात. याठिकाणी सभा घेण्यास जागा नाही. अनेक वर्षे जागा मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. हे 100 ते 200 कोटींचे काम आहे.

 

यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करून देखील प्रयत्नांना यश येताना पाहायला मिळत नाही. अशी खंत भुजबळ यांनी बोलून दाखवली.

 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील सकारात्मक आहेत. मात्र, पालिकच्या अधिकाऱ्यांशी लोकांशी संवाद साधून जागा मोकळी करून घेणे आवश्यक आहे.

 

इतर ठिकाणी ज्या पद्धतीने जमीन अधिग्रहण केले जाते त्या पद्धतीने या जागेचे अधिग्रहण केले जात नाही. जागा ताब्यात घेण्याचा या ठिकाणचा वेग शून्य आहे.

 

जमीन अधिग्रहणाबाबत पालिका अधिकारी नुसते टोलवा टोलवी करत आहे. यामध्ये प्रगती न झाल्यास आंदोलन करण्याची वेळ येईल. असा देखील इशारा छगन भुजबळ यांनी यावेळी दिला.

 

सरकारमध्ये असताना देखील फुलेवाड्याच्या कामासाठी आंदोलनात का करावं लागतं असं विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले,

 

या गोष्टी सरकारला विचारायला हवं या ठिकाणी जे मंत्री, पालकमंत्री यांना विचारायला हवा की या गोष्टीसाठी आंदोलन का? करावा लागत आहे.

 

मी फक्त सरकारमधील घटक पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे मी उपोषण करायला मोकळा आहे. बाकीच्या जबाबदारी असल्या तर थोडीशी अडचण होते, असे भुजबळांनी म्हटले.

 

सरकार स्थापन होत असताना मंत्रिमंडळ बैठकीत स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेले भुजबळ यांनी फुलेवाडा संदर्भात रखडलेल्या कामावरून सुद्धा आपली नाराज व्यक्त करत थेट आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे.

 

त्यामुळे सत्ताधारी पक्षातील आमदारच आंदोलनाच्या तयारीत असल्याने नव्या वादाला तोंड फुटल आहे. भुजबळांनी आंदोलनाचा इशारा देत सरकारला मोठा इशाराच दिलाय.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *