फायली मंजूर होत नसल्याची एकनाथ शिंदे यांची अमित शाह यांच्याकडे अजित पवार यांची तक्रार ?
Ajit Pawar's complaint to Amit Shah about Eknath Shinde's files not being approved?

महायुतीत सारं काही आलबेल आहे, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात असला तरी सर्व काही खरंच ठिक आहे का? अशी चर्चा सातत्याने समोर येत असते.
राज्यात सरकार स्थापन होऊन चार महिने झाले असले तरी रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
विशेष म्हणजे हेही असे की थोडे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे अर्थ खात्याची तक्रार केल्याचा अंदाज वर्तवला जातोय. सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त रायगडावर आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी अमित शाह आले. रायगडावरील कार्यक्रमानंतर अमित शाह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले.
त्यांच्यासोबत महायुतीचे इतर दिग्गज नेते देखील होते. अमित शाह यांच्या या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थखात्याबाबत शाह यांच्याकडे अजित पवार यांची तक्रार केल्याची चर्चा सुरु आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना मंत्र्यांच्या फायली या अर्थखात्याकडून लवकर मंजूर होत नसल्याचा वाद आता अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचला आहे.
आपल्या आमदार आणि मंत्र्यांच्या फायली या क्लिअर होत नसल्याची तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री पुण्यात बैठक पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अर्थखात्याबाबत तक्रार केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बैठकीचा रोख हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थमंत्रालयाकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थ खात्याकडून फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही,
अशी तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केल्याची शक्यता आहे. अर्थ खात्याच्या या भूमिकेमुळे आमदारांच्या विकासकामांना अडथळा येत असल्याची तक्रार शिंदेंनी शाहा यांच्याकडे केल्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची काल रात्री पुण्यात 11 वाजता भेट झाल्याची माहिती आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या विकासकामांना अडथळा येत असल्याची तक्रार केली.
तसेच अर्थखात्याकडून शिवसेनेच्या फायली वेळेवर मंजूर झाल्या पाहिजेत असा आग्रह एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे धरल्याचं वृत्त आहे.
याच बैठकीत एकनाथ शिंदे यांनी रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद सोडवण्याचीदेखील मागणी अमित शाह यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.