राज्यात अवकाळीचे ढग कायम;पहा आज कोठे पडणार पाऊस

Unseasonal clouds persist in the state; see where the rain will fall

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी दिसतंय. मुळात म्हणजे राज्यात सध्या पावसाला पोषक असे वातावरण आहे. काही भागांमध्ये विजांसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला.

 

एप्रिल महिना म्हटले की, पारा अधिक चढतो आणि उन्हाच्या झळा या अधिक तीव्र होताना दिसतात. मात्र, यंदा सर्व गणित बिघडतानाच दिसत आहे.

 

एप्रिल महिन्यात आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये सातत्याने पाऊस कोसळताना दिसतोय. काही भागांमध्ये ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्याचेही चित्र आहे.

 

होळीच्या अगोदर राज्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्याचे चित्र होते. होळीनंतर पारा वाढणार असल्याचा अंदाज देखील होता. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती ही वेगळी झाली असून राज्यावर कमी हवामानाचा पट्टा निर्माण झाला

 

आणि पावसाला पोषक असे वातावरण निर्माण झालंय. यामुळे अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हा हजेरी लावताना दिसतोय. भारतीय हवामान खात्याकडून आता मोठा इशारा देण्यात आला.

राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आज हजेरी लावण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये आज पाऊस येण्याची शक्यता आहे.

 

हेच नाही तर काही शहरांमध्ये उन्हाचा तडका वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलीये. एकीकडे पाऊस पडतोय तर विदर्भातील काही भागांमध्ये पारा उच्चांक गाठताना दिसतोय.

 

लातूर, धाराशिव, बीड, परभणी, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आलाय. यासोबतच जळगाव, धुळे, सांगली, सोलापूर, सातारा या भागांमध्येही आज पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

 

मुंबईत सामान्य वातावरण राहणार आहे. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. ढगाळ वातावरणामुळे हवामानातील उकाडा वाढल्याचेही चित्र आहे.

 

दुसरीकडे चंद्रपूरमध्ये तापमान वाढल्याचे बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच लातूरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे बघायला मिळाले होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *