५० लाखांची लाच; दोन मोठ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
Bribe of Rs 50 lakh; Case registered against two senior officials

पुणे जिल्ह्यातील भूअभिलेख विभागाचे दोन वरिष्ठ अधिकारी सध्या अडचणीत आले आहेत. जमिनीच्या मोजणीसंदर्भात ५० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या गंभीर आरोपांनंतर उप-अधिक्षक अमरसिंह पाटील आणि मोजणी अधिक्षक किरण येटोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तक्रारदारांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे थेट तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने लक्ष घातल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पीडिताने २०२३ पासून पुणे ग्रामीणमधील एका शेतजमिनीची मोजणी व हद्द निर्धारण प्रक्रियेबाबत सातत्याने अर्ज करूनही अधिकारी टाळाटाळ करत होते.
याचदरम्यान, अमरसिंह पाटील व किरण येटोळे यांनी कामासाठी ५० लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर, हेलिकॉप्टर शॉट लावतो अशा प्रकारची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
या तक्रारीनंतर पुणे शहरातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे आता अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे बघायला मिळतंय.
याप्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास हा केला जातोय. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली.
पुण्यात दोन बड्या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई आता करण्यात आलीये. पोलिसांकडून अधिकाऱ्यांची चाैकशी देखील केली जाणार आहे. या प्रकरणात काही मोठे खुलासे होऊ शकतात का? याकडे देखील सर्वांच्या नजरा आहेत.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा हा दाखल करण्यात आला. यासोबतच अधिकाऱ्यांनी त्या तक्रारदाराला धमकी दिल्याचाही आरोप आहे.
मागील काही दिवसांपासून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई ही आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जातंय. मात्र, लाच मागण्याच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अधिकाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल केली जात आहेत.