आता महाराष्ट्रात दुचाकीस्वारांसह मागे बसलेल्यालाही हेल्मेट बंधनकारक

Now helmets are mandatory for both bike riders and those sitting behind in Maharashtra

 

 

 

वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांचा होणारा मृत्यू आणि गंभीर दुखापत याला आळा घालण्यासाठी वाहतूक विभाग अीक्शन मोडवर आला आहे.

 

पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आता दुचाकीस्वारांसह सहप्रवाशांनाही हेल्मेट बंधनकारक करण्याचा निर्णय राज्याच्या वाहतूक विभागाने घेतला आहे.

 

शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दुचाकीस्वार विना हेल्मेट प्रवास करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यासोबतच अपघातांमध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला होता.

 

त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशांवर कारवाईचे आदेश अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

 

अद्यापही या आदेशाची निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. मात्र नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरूद्ध ई- चलान मशीनमध्ये स्वतंत्र हेड खाली कारवाई केली जाणार आहे. पंरतु, या आदेशाची निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.

राज्यासह अनेक महत्वाच्या शहरात हेल्मेटसक्तीला वारंवार विरोध केल्याचे दिसून आले आहे. मात्र, आता दुचाकीस्वारांचे वाढते अपघात लक्षात घेऊन संबंधितांनी हेल्मेट परिधान करण्यासाठी प्राधान्य द्यावे,

 

यासाठी पोलीस प्रशासनाने मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार आदेशाची अमलबजावणी पुण्यातही केली जाण्याची शक्यता आहे. सध्या वाहतूक पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून विनाहेल्मेट दुचाकीस्वारावर कारवाई करत आहेत.

 

दरम्यान, अपर पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार विनाहेल्मेट दुचाकीस्वार, सहप्रवाशी कारवाईच्या जाळ्यात अडकले जाणार आहे. त्यामुळे याला पुणेकरांचा विरोधही होऊ शकतो, अशी शक्यता आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *