मध्यरात्री एक वाजता अजित पवारांची दिल्लीत अमित शाह यांची भेट

Ajit Pawar's meeting with Amit Shah in Delhi at one o'clock midnight

 

 

 

अजित पवार यांच्या कालच्या धावत्या दिल्ली दौऱ्याचे पडसाद राज्यातील राजकारणात उमटत आहे. मध्यरात्री अजित पवार यांनी त्यांच्या सहाकाऱ्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

 

या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली. त्यावेळी त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे पण उपस्थित होते.

 

 

रात्री एक वाजता ही भेट झाल्याने राज्यात अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. ही चर्चा 40-45 मिनिटं चालली. इतक्या मध्यरात्री झालेल्या या भेटीत

 

 

काय घडामोड घडली याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अवघ्या सात तासांच्या या दौऱ्याने राज्यात एकच चर्चा रंगली आहे.

 

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. दिल्लीत पण मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता मध्यरात्री अजित पवार यांच्या धावत्या दौऱ्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला.

 

रात्री एक वाजता त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. 40-45 मिनिटं ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तर सकाळी 8 वाजता

 

अजितदादा हे मुंबईत हजर होते. त्यांच्यासोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पण उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

 

अमित शाह हे नुकतेच राज्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. पुण्यात त्यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली.

 

ते भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके असल्याचा घणाघात केला. त्यानंतर लागलीच अजित पवार यांची दिल्लीवारी झाल्याने चर्चा रंगली आहे.

 

विधानसभेत राष्ट्रवादीच्या पारड्यात किती जागा असतील याविषयीची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला अपेक्षित यश आले नाही.

 

 

तर दुसरीकडे भाजपने विधानसभेसाठी जोरदार आघाडी उघडली आहे. शिंदे गट पण सक्रिय झाला आहे. त्यातच जागांचे त्रांगडे होऊ नये यासाठी

 

 

तीनही पक्ष संवाद ठेवत आहेत. विधानसभेला अधिकाधिक जागा मिळाव्यात यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

महायुतीमध्ये सध्या धुसफूस असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीच्याआधी महायुतीत धुसफूस असणे हे त्यांच्याशी फायदेशीर नाही.

 

 

त्यामुळे डॅमेज कंट्रोल करणं हे भाजपसाठी जास्त महत्त्वाचं असणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर

 

 

भाजपकडून अप्रत्यक्षपणे निशाणा साधला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारदेखील आता भाजपच्या मंत्र्यांवर उघडपणे निशाणा साधताना दिसत आहेत.

 

असं असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री अजित पवार यांच्यासोबत काही मंत्र्यांची शा‍ब्दिक खडाजंगी झाल्याची चर्चा आहे.

 

या बैठकीवरुन दोन्ही बाजू्च्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीनंतर अजित पवार काल रात्री अचानक तडकाफडकी दिल्लीला गेले. तिथे जावून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी अमित शाह यांच्या भेटीत निधी वाटपावरुन जो वाद झाला त्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

 

विशेष म्हणजे अजित पवार यांनी 10 दिवसांपूर्वीदेखील अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी पुन्हा अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

 

अजित पवार यांनी काल अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते परत मुंबईत परतले आहेत. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर गेले आहेत. तिथे दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

 

 

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाच्या काही नेत्यांचा भाजपवर हल्लाबोल सुरु होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील भाजपच्या चार मंत्र्यांची नावे घेत निशाणा साधला होता.

 

 

यानंतर निधीवाटपावरुन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार आणि अमित शाह यांच्यातील भेट ही निधी वाटपाच्या नाराजी नाट्यावर असल्याची चर्चा आहे.

 

दरम्यान, दुसरी चर्चा अशीदेखील आहे की, विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. महायुतीच्या तीनही पक्षांकडून जागावाटपाबाबत वेगवेगळा दावा केला जातोय.

 

त्यामुळे जागावाटपावर चर्चा करण्यासाठी अमित शाह आणि अजित पवार यांच्यात काल भेट झाली. यानंतर देवेंद्र फडणवीस आज अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत.

 

पण जागावाटपावर चर्चा करायची असेल तर महायुतीत तीन पक्ष आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्षदेखील महायुतीचा अविभाज्य घटक आहे.

 

 

त्यामुळे महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या पक्षाचा एखादा प्रमुख नेता असणे अपेक्षित आहे. पण तसं काही होताना दिसलेलं नाही. त्यामुळे महायुतीत पडद्यामागे काय घडतंय? याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *