उद्धव ठाकरे राज ठाकरेंना म्हणाले; अदानीला प्रश्न विचारला अन् चमचे वाजले
Uddhav Thackeray said to Raj Thackeray; Adani was asked a question and spoons rang
सलीम कुत्ता प्रकरणावरुन विधान भवनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये गदारोळ पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांनी सभागृहाबाहेर बोलताना सरकारवर घणाघात केला.
तसेच त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. कोणाच्याही मनात आलं म्हणून कारवाई केली जात आहे.
आमच्याकडे पुरावे असून देखील एसआयटी स्थापन का केली जात नाही? भाजपचा निर्लज्ज कारभार सुरुयं, अशी टीका ठाकरेंनी केली.
नागपूरच्या स्फोटाची चौकशी झाली पाहिजे. अधिवेशनाची सुरुवात नबाव मलिक यांच्या मुद्द्याने झाली. आम्हाला उपमुख्यमंत्र्यांबाबत अभिमान वाटू लागला होता.
आम्ही पत्र लिहिलं इक्बाल मिर्ची, प्रफुल्ल पटेल यांचं काय म्हणून विचारणा केली. पण, आम्हाला अद्याप उत्तर मिळालं नाही, असं ठाकरे म्हणाले.
राज्य कोण चालवतंय हे कळत नाही. आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा आमच्यावर आरोप करण्यात आले. आज तेच तुमच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.
त्यामुळे आम्ही शेण खाल्लं असेल तर तुम्ही देखील तेच खाताय. खरं कोण खोटं कोण होऊन जाऊद्या. कर नाही तर डर कशाला. एसआयटी लावा. आमचे मंत्री ज्याच्या लग्नाला गेले होते तो देशद्रोही नाही हे जाहीर करुन टाका, असा निशाणा ठाकरे यांनी साधला.
लग्नाला पोलीस अधिकारी देखील होते. त्यांच्यावर कारवाई झाली. मग कोणी मंत्री होते का याची चौकशी तरी करा, आधीच काय जाहीर करताय, असा सवाल ठाकरेंनी केला.
धारावी येथे मोर्चा काढण्याच्या मुद्द्यावरुनही ठाकरेंनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मला आता कळायला लागलंय अदानीचे चमचे कोण-कोण आहेत.
आम्ही अदानीला प्रश्न विचारला तर चमचे का वाजत आहेत! आंदोलन केल्यावर विषय काय हे विचारुन बोलतात. त्यामुळे अर्धवट माहितीवरुन कोणी प्रश्न विचारु नये. तसेच विमानाला टोल लागत नाही. शालीचं वजन पेलतंय का नाही हे त्यांनी बघायला पाहिजे, असा टोमणा त्यांनी मारला.
धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. कोणत्याही परिस्थिती धाराविकरांचा विकास आम्हाला हवा आहे. याबाबत सरकारच्या माध्यमातून प्रकल्प राबवावा अशी आमची इच्छा होती,
असं ठाकरे म्हणाले. यावेळी ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. मोदी आता गुजरातचे मुख्यमंत्री नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत हे लक्षात ठेवावं असं ते म्हणाले.