महाविकास आघाडीचा लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?
Mahavikas Aghadi's Lok Sabha seat allocation formula?
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. येत्या 29 आणि 90 डिसेंबर रोजी ठरणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्यानंतर दिल्लीत जागावाटपाबाबत बैठक होणार आहे. जागावाटपाबात दोन फॉर्म्युलांवर चर्चा होऊ शकते.
महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरची जागा लढवण्यासाठी एका पक्षातील बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करु शकतो असंही कळतं.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आता राजकीय पक्षांकडून लोकसभा जागा लढवण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
देशव्यापी पातळीवरील इंडिया आघाडीतील महाविकास आघाडीतही जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे.
अशातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीत 15 ते 16 जागा लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे
पहिला फॉर्म्युला
ठाकरे सेना – 20
काँग्रेस – 16
शरद पवार गट – 10
बाळासाहेब आंबेडकर/राजू शेट्टी – 02
दुसरा फॉर्म्युला
23 ठाकरे गट
15 काँग्रेस
10 शरद पवार गट
महाविकास आघाडीसोबत डाव्या-प्रागतिक पक्षांची आघाडी आहे. यामध्ये डावे पक्ष, समाजवादी पक्ष, शेकाप आदी पक्ष आहेत. तर, वंचित बहुजन आघाडीची शिवसेना ठाकरे गटासोबत युती आहे.
त्यामुळे जागा वाटप करताना या पक्षांनादेखील विचारात घ्यावे लागणार आहे. या पक्षांना लोकसभेसाठी जागा न सोडल्यास विधानसभेसाठी जागा मविआला सोडाव्याच लागणार आहेत.
त्यामुळे मविआमध्ये लोकसभा जागा वाटप वर दिलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे होतो की आणखी काही फॉर्म्युला ठरतोय, हे लवकरच समजेल.
महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. संजय राऊत कुठून आकडे देतात त्यांना माहीत नाही. संजय राऊत यांना बोलायची सवय आहे त्यांच्या आकड्यावर मी बोलणार नाही.
29 डिसेंबर काँग्रेस बैठक आहे त्या बैठकीत मित्र पक्षासोबत जागावाटपावर चर्चा होईल. मेरीटच्या आधारावर जागा वाटप अशी माहिती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.