एकनाथ खडसेंच्या पायात चप्पलही घालायला पैसे राहणार नाहीत; गिरीश महाजन
Eknath Khadse will not have money to even put slippers on his feet; Girish Mahajan

एकनाथ खडसेंच्या डोक्यात मानसिक बिघाड झाला आहे, यांना महसूल चोरीमुळे 137 कोटी रुपये भरावे लागणार आहेत, राजकीय अस्तित्व संपलं आहे आणि त्यांच्याकडे पायात चप्पलही घालायला पैसे राहणार नाहीत
असं प्रत्युत्तर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं. गिरीश महाजन यांचे सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेमध्ये काही फोटो दाखवले होते. त्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.
गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी केले आहेत. विधानपरिषदेत त्यांचे फोटो दाखवत महाजनांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी खडसेंनी केली आहे.
गिरीश महाजनांवर आरोप करताना एकनाथ खडसे म्हणाले की, “सलीम कुत्ता यांच्याशी गिरीश महाजन यांचे संबंध आहेत. त्यामुळे यांच्यावर दहशतवाद विरोधी गुन्हे दाखल करावेत.
ग्रामविकास मंत्री यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत. जर बडगुजर यांचं नाव घेतलं जातं मग गिरीश महजन यांचं नाव का घ्यायचं नाही? गिरीश महाजन यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.
या प्रकरणी एसआयटी चौकशी स्थापन करण्याचे आदेश आपण तत्काळ उपसभापती निलम गोऱ्हे यांनी द्यावेत असे आम्हाला वाटतं. सरकारने तात्काळ कारवाई करावी. बॉम्ब स्फोटाशी सबंधित व्यक्तीशी संबंध असल्याने गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्यावा.”