लाचखोर सुसाट ;दहा महिन्यात साडेतीन कोटी लाचखोरांनी ‘गिळली ’ पाहा कोणता जिल्हा टॉपमध्ये
Bribery Susat: Three and a half crores were 'swallowed' by bribers in ten months, see which district is in the top
राज्यात भ्रष्टाचाराच्या कीडीने व्यवस्था पोखरली असून, शासकीय कामांच्या मोबदल्यात घेतली जाणारी लाचेची रक्कम आता थेट लाखो रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
दहा महिन्यांत राज्यात तब्बल साडेतीन कोटी रुपयांची रक्कम लाचखोरांनी ‘पोटात’ घातली आहे. सहकार व पणन विभाग अग्रस्थानी असून, लाचखोरांचा आकडा वाढत असल्याची नोंद ‘एसीबी’ने केली आहे.
-२१ फेब्रुवारी (७ लाख) : हरीश मथुरादत्त सत्यवली (वय ५६) व प्रदीप कटियाल
-३ मार्च (३.५० लाख) : सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार येथील कार्यकारी अभियंता संशयित महेश प्रतापराव पाटील
-५ मार्च (१.५० लाख) : त्र्यंबकेश्वर-इगतपुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील शासकीय वाहनचालक संशयित अनिल बाबूराव आगीवले
-९ मार्च (२ लाख) धुळे महावितरण व्यवस्थापक संशयित अमर अशोक खोंडे व उपव्यवस्थापक मनोज अर्जुन पगार
-१० मार्च (३ लाख) : त्र्यंबकेश्वर भूमी अभिलेख उपअधीक्षक दौलत नथू समशेर, अभिलेखपाल भास्कर प्रकाश राऊत व खासगी व्यक्ती वैजनाथ नाना पिंगळे
-२१ मार्च (एक लाख) : अहमदनगर विशेष लेखापरीक्षक किसन दिगंबर सागर व खासगी लेखापरीक्षक तय्यब वजीर पठाण
-३० मार्च (२० लाख रुपये): सिन्नर सहायक निबंधक रणजित महादेव पाटील (वय ३२) व वरिष्ठ लिपिक सहायक प्रदीप अर्जुन वीरनारायण (४५)
-१६ मे (३० लाख) : जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे व खासगी वकील शैलेश सुमतिलाल साभद्रा
-२८ जून (४० लाख) : दिंडोरी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश श्रीराम अपार
-७ जुलै : (१.२५ लाख रुपये) नंदुरबार वनपाल संशयित संजय मोहन पाटील, वनरक्षक दीपक दिलीप पाटील व खासगी व्यक्ती नाजीम नबी खाँ पठाण
-१८ जुलै (३ लाख): जळगाव येथील राहुल बाबासाहेब गायकवाड, अंमलदार तुषार केशव पाटील व खासगी व्यक्ती ऋषी दुर्गप्रसाद शुक्ला
-६ ऑगस्ट (१५ लाख) : नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम
-१८ ऑगस्ट (५ लाख) : यावल महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेवरील अवसायक संशयित सखाराम कडू ठाकरे
-२९ ऑगस्ट (१ लाख) : शिर्डी पोलिस ठाणे पोलिस अंमलदार संशयित संदीप काशीनाथ गडाख
– ३१ ऑगस्ट (१.५० लाख) : अहमदनगरमधील श्रीगोंदा येथील तलाठी आकाश नारायण काशीकेदार
– १७ सप्टेंबर (४ लाख रुपये) : चाळीसगाव जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अभियंता संशयित ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते
-३ नोव्हेंबर (१ कोटी रुपये) : अहमदनगर ‘एमआयडीसी’तील सहायक अभियंता संशयित अमित किशोर गायकवाड व धुळे ‘एमआयडीसी’तील कार्यकारी अभियंता गणेश वाघ
(तारीख, कंसात लाचेची रक्कम व संशयित)
असंपदा : महापालिकेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (५० हजारांची लाच) यांची ‘ईडी’ चौकशी. धनगरांकडे उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा ९६ लाख ४३ हजार ८०९ रुपयांची ६४.८१ टक्के अधिक मालमत्ता आढळली
जून ते नोव्हेंबर २०२३ पर्यंतचे विभागनिहाय ‘आकडे’
लाचेची एकूण रक्कम : ३ कोटी ३७ लाख २४ हजार ८५५ रुपये
सहकार व पणन : ७३ लाख ३८ हजार शंभर रुपये
महसूल : ४२ लाख ७२ हजार ६९० रुपये
पोलिस : ३७ लाख ३६ हजार शंभर रुपये
महापालिका : २५ लाख ६२ हजार चारशे रुपये
शिक्षण : २४ लाख ५९ हजार २१५ रुपये
जलसंपदा : १५ लाख ३१ हजार ६३० रुपये
पंचायत समिती : १४ लाख ६ हजार आठशे रुपये
आरोग्य : १३ लाख ६७ हजार पाचशे रुपये
सार्वजनिक बांधकाम : ११ लाख ५० हजार रुपये
स्पीकर बॉक्समधून व्हायची ड्रग्ज तस्करी? सोलापुरात आणखी एका गोदामाचा पर्दाफाश, लाखांचो मुद्देमाल जप्त
राज्यातील कारवाई
सापळे ७००
अपसंपदा ८
अन्य भ्रष्टाचार- ३
अभियोगपूर्व प्रलंबित- ४१
अभियोगपूर्व मंजुरी- ३
दोषारोप दाखल – २०
परीक्षेत्रनिहाय स्थिती
परीक्षेत्र – सापळा – एकूण गुन्हे – तपास प्रलंबित – दोषारोपपत्र दाखल
नांदेड – ५५ – ५७ – ५६ – १
ठाणे – ९३ – ९३ – ९१ – ०
छत्रपती संभाजीनगर – ११५ – ११५ – ९३ – ३
पुणे – १२४ – १२५ – १११ – ४
नाशिक – १४० – १४२ – १३७ – ३
नागपूर – ७० – ७० – ६८ – १
अमरावती – ७२ – ७३ – ६३ – ३
मुंबई – ३१ – ३६ – २६ – ५
एकूण – ७०० – ७११ – ६४५ – २०