पूजा खेडकर प्रकरण ; UPSC अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

Pooja Khedkar case; Hasty resignation of UPSC chairman

 

 

 

महाराष्ट्रात पूजा खेडकर प्रकरणावरून लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे.

 

निवडीसाठी UPSC उमेदवारांकडून बनावट जात आणि अपंगत्व प्रमाणपत्र वापरण्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा आल्याने भूवया उंचावल्या आहेत.

 

द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मनोज सोनी, ज्यांनी मे 2022 मध्ये UPSC चेअरपर्सन म्हणून पदभार स्वीकारला, त्यांच्या कार्यकाळात अजून पाच वर्षे बाकी आहेत.

 

 

मनोज सोनी यांनी महिनाभरापूर्वीच आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला होता, मात्र त्यावर सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.सोनी यांच्या राजीनाम्याचा सध्या सुरू असलेल्या वादाशी संबंध नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी, डॉ. सोनी यांनी 28 जून 2017 ते 15 मे 2023 पर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून काम केले. डॉ.सोनी यांनी तीन वेळा कुलगुरू म्हणून काम पाहिले.

 

1 ऑगस्ट 2009 ते 31 जुलै 2015 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सलग दोन टर्म आणि

 

एप्रिल 2005 पासून महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदाचे (एमएसयू ऑफ बडोदा) कुलगुरू म्हणून एक टर्म एप्रिल 2008 पर्यंत होते.

 

 

बडोद्याच्या MSU मध्ये रुजू होताना डॉ. सोनी हे भारतातील सर्वात तरुण कुलगुरू होते. वैयक्तिक कारणास्तव सोनी यांनी राजीनामा दिला आहे.

 

सूत्रांचे श्रेय देऊन अहवालात नमूद केले आहे की डॉ. सोनी यांना गुजरातमधील स्वामीनारायण संप्रदायाची शाखा असलेल्या अनूपम मिशनसाठी अधिक वेळ घालवायचा आहे.

 

दरम्यान, पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. यूपीएससीने केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली क्राईम ब्रँचने पूजा खेडकर यांच्यावर बनावटगिरी,

 

फसवणूक आणि दिव्यांगत्वाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पूजा खेडकरांच्या प्रकरणात आता दिल्ली क्राईम ब्रँचही तपास करणार असल्याने खेडकरांचा पाय आणखी खोलात चालल्याची स्थिती आहे.

 

 

खोटे दिव्यांग प्रमाणपत्र बनवून परीक्षा दिल्याचा आरोप करण्यात येतोय. तसेच कोट्यवधींची संपत्ती नावावर असताना ओबीसी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटही त्यांनी काढल्याचं समोर आलं आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *