राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना घेतले फैलावर !
Rahul Gandhi took the Congress leaders to the table
ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेत्यांची एक बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये २०२४च्या निवडणुकीच्या तयारीवर चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी पक्षाच्या नेत्यांवर नराज झाल्याचं बघायला मिळालं.
‘लाईव्ह हिंदुस्थान’ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधींनी उत्तर प्रदेशात उत्साही नेत्यांची कमी असल्याचं नमूद केलंय. त्यांनी तेलंगणाचा हवाला देताना म्हटलं की,
तेलंगणामध्ये पक्ष अनेक वर्षे सत्ते नसतानाही सत्ता मिळवण्यासाठी जिद्द दिसून आली. मात्र उत्तर प्रदेशातले नेते तेलंगणा आणि काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वावर भरोसा ठेवून आहेत.
.
राहुल गांधी पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशातले नेते माझ्या आणि प्रियंकाच्या नेतृत्वात पदयात्रा काढा, म्हणत आहेत. मुळात उत्तर प्रदेशात तीनसुद्धा नेते असे नाहीत
जे मुख्यमंत्री होण्यास इच्छूक आहेत. त्यांनी पुन्हा तेलंगणाचं उदाहरण दिलं आणि तिथं चार नेते मुख्यमंत्री पदासाठी इच्छूक होते, असं सांगितलं.
मुस्लिम वोटिंगबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले, पक्षाच्या एका नेत्याने सांगितलं की, पक्षाचा प्रत्येक सदस्याला गांधी कुटुंबातील सदस्याने उत्तर प्रदेशात पक्षाचं नेतृत्व करावं, असं वाटतं.
परंतु ते स्वतः राज्यात किती सक्रीय असतील, याबाबत त्यांनी माहिती नाही. अनेक नेत्यांनी म्हटलं की, मुस्लिम मतदार या निवडणुकीत काँग्रेसकडे आशेने बघत आहेत. त्यासाठी पक्षाला मजबुतीने उभं राहिलं पाहिजे आणि समाजवादी पक्षासोबत आघाडी केली पाहिजे.
लखनऊ येथील बैठकीमध्ये उत्तर प्रदेशातल्या पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर आपलं म्हणणं मांडलं. गांधी परिवारातील सदस्यांचा सक्रीय सहभाग कॅम्पेनमध्ये असावा,
अशी मागणीच त्यांनी केली. सूत्रांनी सांगितलं की, २० डिसेंबरपासून सुरु झालेल्या युपी जोडो यात्रेमध्ये राहुल आणि प्रियंका गांधी यांनी सहभागी व्हावं, अशी मागणी केली असली तरी केंद्रीय नेतृत्वाने त्यावर विचार करु, असं सांगितलं.