भाजपच्या जेष्ठ मंत्र्याला मतदारसंघातील तरुणांनी घेरले, चिखलाच्या रस्त्यातून जाण्यास भाग पाडले

A senior BJP minister was surrounded by the youth of the constituency, forced to walk through a muddy road

 

 

 

 

जामनेर तालुक्यातील लिहे तांडा येथील वस्तीत असलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने मंत्री गिरीश महाजन यांना तरुणांनी घेरले.

 

रहिवासी वस्तीतील गावकऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून अशा परिस्थितीत राहावे लागत आहे. १३ सप्टेंबर रामदेव बाबा यात्रोत्सवा निमित्त मंत्री महाजन हे लिहे तांडा येथे आले असता

 

तरुणांनी त्यांना त्या रस्त्यातून प्रवास करण्यास भाग पाडले. स्वतः मंत्री महाजन यांनी मोटारसायकलवर बसून रस्त्याची पाहणी केली.

 

 

राज्यात जेव्हा संकट येते अथवा राजकीय परिस्थितीतून मार्ग काढायचा असतो तेव्हा मंत्री गिरीश महाजन यांची निवड केली जाते. यामुळेच त्यांना संकटमोचक म्हणून संबोधले जाते.

 

आता याच संकट मोचक महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील रस्त्यांचे संकट कोण निवारणार? हा देखील मोठा प्रश्न जनतेला पडलेला आहे.

 

 

मंत्री गिरीश महाजन हे गेल्या 35 वर्षापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आज मंत्री गिरीश महाजन हे जामनेर मतदार संघातील लिहे तांडा येथे नागरिकांच्या भेटीसाठी गेले असता

 

त्यांना रस्त्याच्या प्रश्नाबाबत जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. मंत्री गिरीश महाजन हे महाराष्ट्र राज्यात संकट मोचक म्हणून ओळखले जातात.

 

मात्र त्यांच्याच मतदारसंघातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याचमुळे मंत्री गिरीश महाजन हे स्वत:च्या मतदारसंघात संकटात सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

 

दुसऱ्यांचे पहावे वाकून आणि स्वतःचे ठेवावे झाकून या म्हणीचा प्रत्यय जामनेर मतदारसंघातील मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात आज आला.

 

नागरिकांनी अक्षरशः त्यांना चिखलाच्या रस्त्यातून दुचाकी वर बसून जाण्यास भाग पाडले. मंत्री गिरीश महाजन महाराष्ट्र राज्यात दौरा करीत असताना

 

ते स्वत:च्या जामनेर मतदार संघातील उदाहरण देत असतात. मात्र आज महाजन यांच्या मतदारसंघातील बिकट परिस्थिती जनतेसमोर आली आहे.

 

रस्त्यासंदर्भात नागरिकांनी जाब विचारला, जनतेचा रोष पाहून गिरीश महाजनांचा काढता पाय

 

जामनेर तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. मात्र या रस्त्यांकडे मंत्री गिरीश महाजन हे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील या ठिकाणी रहिवाशांनी केला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *