जागावाटपावरून काँग्रेस अन् ठाकरे गटात जुंपली
Congress and Thackeray have joined forces over seat allocation

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन तूतू-मैं-मैं सुरु असल्याचं दिसून येत आहे. संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केल्यानंतर काँग्रेसकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी राऊतांना जशास तसं उत्तर दिलं.
”कोण काय बोलतंय, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात शिवसेना आहे. शिवसेना म्हणजे सर्वात मोठा पक्ष. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे.
त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांसोबत आमचं बोलणं सुरु आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, वेणूगोपाल यांच्यासोबत आमची बोलणी सुरु आहे.
जे निर्णय प्रक्रियेत आहेत. त्यांच्यसोबत आमचा संवाद सुरु आहे. या गोष्टी दिल्लीत होतील. गावातल्या, गल्लीतल्या लोकांनी काहीही म्हटलं तरी फरक पडत नाही.”
संजय राऊत पुढे म्हणाले, ”आम्ही नेहमी २३ जागा लढत आलेलो आहोत. त्या आमच्या जागा कायम असतील. ज्या जागा आम्ही जिंकल्या आहेत, त्यावर आम्ही नंतर बोलणार, असं म्हटलं आहे.
त्यात काँग्रेस येतच नाही. कारण त्यांनी जागा जिंकलेल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसला शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. बाकी कुणी काहीही बोललं तरी फरक पडत नाही.”
”संजय राऊत यांच्यानुसार, त्यांचे ४० आमदार पक्ष सोडून गेल्यानंतरही, ते सर्वात मोठा पक्ष आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार इंडिया आघाडीने शून्य सीट्स पासून सुरुवात करुन चर्चा करायला हवी.
परंतु आमचा पक्ष महाराष्ट्र विधानसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष असून त्याचे नेतृत्व करत आहे.. मी संजय राऊतांना सांगू इच्छितो की,
कोणतेही जागावाटप हे महाराष्ट्राच्या स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी या मताशी सहमत आहे.