मंत्रिपद फक्त अडीच वर्षासाठीच ;महायुतीचा नवा फॉर्म्युला
Ministerial post for only two and a half years; Mahayuti's new formula
महायुतीच्या मंत्र्यांचा आता थोड्याचवेळात शपथविधी होईल. त्यात आतापर्यंत महायुतीच्या 39 आमदारांना फोन करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळात काही जुने चेहरे आहेत तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
या मंत्रिमंडळात काही जणांना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे नाराजीचा सूर पण उमटत आहेत. अनेक दिग्गजांना नारळ देण्यात आला.
त्याचे पडसाद पण काही दिवसात उमटतीलच. पण त्यापूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्री पदाचा एक फॉर्म्युला सांगीतला आहे. हा फॉर्म्युला इतर दोन घटक पक्षांनी अवलंबला तर कदाचित नाराजांच्या आशा पल्लवित होतील.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात अडीच-अडीच वर्षासाठी मंत्रिपदाचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे कोणी नाराज होऊ नये, असे ते म्हणाले.
मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देत नाही. काही जणांना मागच्या वेळी दीड वर्ष टर्म मिळाली. आम्ही आता ठरवलं आहे. आता ५ वर्षात मंत्र्यांना
अडीच अडीच वर्ष टर्म देण्यात येणार आहे. आमच त्यावर एकमत झालं आहे. सध्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा काळ मिळणार आहे, असे दादा म्हणाले.
फेब्रुवारी २०२२ मधे जिल्हा परिषद निवडणुका होण गरजेचं होतं मात्र ३ वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. आता अनेक निवडणुका होणार आहेत, असे दादांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्या नंतर सुनील तटकरे चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्यक्ती एकत्र बसणार आहे आणि २ महिन्यात महामंडळ निवडी पार पडणार आहेत, असे दादांनी सांगीतले.
विदर्भात ७ जागा लढलो. मोर्शी जागा मैत्रीपूर्ण लढत झाली. जर तसं झालं नसतं तर देवेंद्र भुयार निवडून आले असते. बुलढाणा जिल्हाध्यक्ष काजी यांचं अभिनंदन करतो.
बुलढाणा बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ३०० कोटी रुपये देण्याची व्यवस्था केली. शेतकऱ्यांसाठी केल मात्र त्या ठिकाणी असलेली व्यक्ती आपलाल्या सोडून गेले.
आम्ही काजी यांना विचारलं त्यांनी मनोज कायंदे यांचं नाव सांगितलं. त्यांनी सांगितल होतं जर तो निवडून आला नाही तर आम्ही तोंड दाखवणार नाही.
आम्ही काजी यांच्या पाठीशी उभ राहिलो आणि कायंदे यांना संधी दिली आणि तो निवडून आला, असे कौतुक त्यांनी केले.