संजय राऊतांना ‘मातोश्री’वरील बैठकीत मारहाण झाल्याच्या व्हायरल Videoने खळबळ, काय आहे सत्य ?

Viral video of Sanjay Raut being beaten up at a meeting on 'Matoshree' creates a stir, what is the truth?

 

 

 

ठाकरे गटाची बुलंद तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय राऊतांना मारहाण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे.

 

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच मातोश्रीमध्ये संजय राऊतांंना मारहाण झाल्याचा दावा करण्यात आलाय.

 

मातोश्रीमध्ये झालेल्या बैठकीवेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनीच त्यांना मारहाण करत खोलीमध्ये डांबून ठेवल्याचं सांगितलं जात आहे.

 

व्हायरल व्हिडीओची टीम सजगने सत्यता तपासून पाहिल्यावर वेगळंच सत्य समोर आलं आहे.

१ जानेवारी २०२५ ला उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाची बैठक होती. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली जात होती.

 

यादरम्यान संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा पक्षाला फटका बसत असल्याची टीका काही नेत्यांनी केली.

 

यावरून संजय राऊत आणि नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. शब्दाने शब्द वाढत गेल्याने काही वेळानंतर बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं.

 

उद्धव ठाकरेंसमोर त्यांना नेत्यांनी मारहाण केली आणि इतकंच नाहीतर काही तास एका खोलीमध्ये कोंडून ठेवल्याचा दावा NMF न्यूजने केला आहे.

 

सोशल मीडियावर अनेकांनी या बातमीला खरं समजून राऊतांबाबत चुकीचे उद्गार काढले. मात्र खरंच मारहाण झाली की नाही याचा टीम सजगने तपास केला.

ठाकरे गटामध्ये खासदार संजय राऊत हे वरिष्ठ नेते आहे. पक्षातील कोणतेही निर्णय घेताना त्यामध्ये राऊतांचाही समावेश असतो.

 

त्यामुळे नेत्यांनी उद्धव ठाकरेंसमोरच अशा प्रकारे मारहाण कशी होऊ शकते? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

 

याबाबत ठाकरे गटातील कोणीही काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र NMF न्यूजचा व्हिडीओ नेटकरी मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

NMF न्यूजच्या बातमीनुसार संजय राऊत यांना १ जानेवारी २०२५ ला मारहाण झाली. मात्र टीम सजगच्या तपासामध्ये राऊत हे मुंबईमध्ये नसल्याचं समोर आलं.

 

कारण संजय राऊत यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर दोन फोटो शेअर करत हॅप्पी न्यू ईयर कॅप्शन दिलं आहे. संजय राऊत हे नवीनवर्षानिमित्त शिमलामध्ये गेल्याची माहिती समजली आहे.

 

निष्कर्ष : संजय राऊत यांना मारहाण झाल्याची बातमी खोटी आहे. कारण राऊत हे मुंबईमध्येच नसल्याने त्यांना मारहाण होण्याचा काहीही संबंध येत नाही.

 

मुळात मातोश्रीवर अशी कोणतीही बैठक झाली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ चुकीचा आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *