मराठवाड्यात महायुतीमध्ये बंडाला सुरुवात,भाजप आमदाराविरोधात दादांच्या शिलेदाराच बंड

Rebellion started in Marathwada Mahayuti, Dada Shiledara's rebellion against BJP MLA

 

 

 

विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरु असताना महायुतीत पहिलं बंड झालं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा सातत्यानं राज्याचे दौरे करत असताना,

 

जागावाटपासाठी बैठका घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारानं भाजपच्या आमदाराविरोधात दंड थोपटले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील

 

गंगापूर मतदारसंघातून आमदार सतीश चव्हाणांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. २००९ पासून प्रशांत बंब गंगापूरचे आमदार आहेत. गेल्या दोन निवडणुका ते भाजपच्या चिन्हावर जिंकले आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी अपक्ष निवडणूक लढण्यामागील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मी गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून मतदारसंघात काम करत आहे.

 

मतदारसंघात मोठी अस्वस्थता आहे. गंगापूरचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. गेल्या १५ वर्षांपासून कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे. लोकांना आता बदल हवा आहे,’ असं चव्हाण म्हणाले.

 

राज्यात भाजप, राष्ट्रवादीची युती असताना, सीटिंग-गेटिंगचा फॉर्म्युला असताना गंगापूरची जागा राष्ट्रवादीला सुटणार का, असा प्रश्न चव्हाण यांना विचारण्यात आला.

 

त्यावर आता तसं काही राहिलेलं नाही. सर्व्हेचा जमाना आहे. ज्याचं नाव सर्व्हेत असतं, त्याला पक्ष उमेदवारी देत असतो. त्यात मीच आघाडीवर राहीन असं वाटतं. आता लढावं तर लागेल ना, असं म्हणत चव्हाणांनी विधानसभा लढणार असल्याचं जाहीर केलं.

 

 

विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. महायुतीच्या एकूण आमदारांची संख्या २०० च्या घरात जाते. यात तिन्ही घटक पक्ष, त्यांच्यासोबतचे लहान पक्ष, महायुतीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांचा समावेश होतो.

 

जागावाटपात सीटिंग-गेटिंगचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा असं सूत्र ठरलं आहे. त्यामुळे जवळपास २०० जागांचा विषय मार्गी लागल्यात जमा आहे.

 

२००९ पासून प्रशांत बंब गंगापूरचे आमदार आहेत. २००९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत शिवसेनेच्या अण्णासाहेब माने पाटील यांचा तब्बल २३ हजार मतांनी पराभव केला.

 

अपक्ष लढत बंब यांनी विद्यमान आमदाराला धक्का दिला. २०१४ मध्ये बंब यांनी सेनेच्या अंबादास दानवेंचा १७ हजार मतांनी पराभव केला. त्यावेळी बंब भाजपच्या तिकिटावर लढले.

 

२०१९ मध्येही बंब यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या अण्णासाहेब माने पाटील यांचा जवळपास ३५ हजार मतांनी धुव्वा उडवला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *