दोन वेळा खासदार असलेल्या पूनम महाजनांचा पत्ता कट
Two-time MP Poonam Mahajan's address hacked
लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने उत्तर मध्य मुंबई या मतदारासंघासाठी आज (27 एप्रिल) उमेदवाराची घोषणा केली.
ज्यामध्ये त्यांनी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना तिकीट जाहीर केलं आहे. याचाच अर्थ भाजपने येथील विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आहे.
भाजपचं ‘मिशन 400’ वर लक्ष केंद्रित केलं आहे.. त्यामुळेच आपला प्रत्येक उमेदवार हा अत्यंत पारखून देण्यावर भाजपचा भर आहे.
त्यामुळेच तब्बल दोन वेळा खासदार असलेल्या पूनम महाजन यांचं तिकीट कापून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी या मुबंई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणुकीसाठी उतरविण्यात आलं आहे.
यामुळे आता मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशी थेट लढत असणार आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना तिकीट जाहीर केलं होतं.
त्यामुळे तेवढ्याच तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात भाजप होतं. अखेर भाजपने पूनम महाजन यांना डावलत उज्ज्वल निकमांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.
याआधी भाजपने याच जागेसाठी अभिनेत्री माधुरी दीक्षितशी संपर्क साधला होता अशीही चर्चा होती. दुसरीकडे भाजप आमदार आशिष शेलार यांनी
या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. पण या सगळ्यांना मागे टाकत उज्ज्वल निकम यांनी बाजी मारली आहे.
वांद्रे पश्चिम आणि विलेपार्ले येथे राहणाऱ्या उच्चभ्रू-शिक्षित वर्गाला आकर्षित करू शकणाऱ्या प्रमुख व्यक्तीच्या शोधात भाजप होता. त्यामुळेच उज्ज्वल निकम यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीच्या नावावर अखेर भाजपने शिक्कामोर्तब केलं आहे.