नव्या वर्षात कसे राहील वातावरण ;पहा हवामान विभागाचा अंदाज
How will the weather be in the new year; see the forecast of the Meteorological Department
अवघ्या एका दिवसानंतर आपण नवीन वर्षात 2024 मध्ये जाणार आहोत.अगदी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ढगाळ वातावरणामुळे मुंबईसह कोकणातील थंडी गायब होणार आहे.
हवामान ढगाळ वातावरण असल्याचा अंदाज हवमान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह कोकणात 3 ते 7 जानेवारीपर्यंत म्हणजे 5 दिवस ढगाळ वातावरण आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासूंन तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात तापमानात मोठी घट झाली असून थंडी वाढली आहे.
दारमयह, पुढील दोन दिवसांत राज्यात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या पुणे, मुंबईसह विदर्भ,
मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. त्यात पुढील काही दिवस आणखी घट होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान १६ आणि दुपारचे कमाल तापमान ३० आहे. १ ते ७ जानेवारी दरम्यान याच पातळीत राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अहमदनगर, पुणे, जळगाव, कोल्हापूर आणि महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक थंडी आहे. हवामाना खात्याच्या अंदाजानुसार, 2 जानेवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता असून
त्यानंतर तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रावर बाष्पयुक्त ढग निर्माण झाल्यामुळे राज्यासह
देशाच्या हवामानावर याचा परिणाम दिसून येणार आहे, त्यामुळे 2 डिसेंबरपर्यंत राज्यात देशात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रावर बाष्पयुक्त ढग निर्माण झाल्यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश अरुणाचल आणि केरळसह महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील,
असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ३१ डिसेंबरपासून २ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे.