खरा राष्ट्रवादी राष्ट्रवादी कोण ? काका कि पुतण्या ?आज सुनावणी

Who is the real nationalist nationalist? Uncle or nephew? Hearing today

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगात गुरुवारी (ता.९)सुनावणी होत आहे. मागील महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरुन नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला होता.

 

तर, सुनावणी लवकर संपविण्यासाठी घाई करीत असल्याबद्दल आयोगाने अजित पवार गटाला चांगलेच फटकारले होते. निवडणूक आयोगात

 

 

 

अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मनिंदर सिंग हे बाजू मांडत आहेत; तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडत आहेत.

 

 

 

 

अजित पवार गटाने ‘राष्ट्रवादी’वर आपला हक्क सांगताना पी. ए. संगमा, सादिक अली या दोन प्रकरणांसह शिवसेनेतील सत्ता संघर्षाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निकालाचा हवाला दिला होता.

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे उभी फूट पडली. अजित पवार शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपसोबत एकत्र येत सत्तेत सामील झाले.

 

 

 

त्यानंतर राष्ट्रवादी नेमकी कोणाची हा मुद्दा थेट निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. आज याच प्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. आज निवडणूक आयोग काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *