भाजप आमदाराची पत्नी थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात;भाजपमध्ये खळबळ

BJP MLA's wife directly campaigning for Thackeray group's candidate; excitement in BJP

 

 

 

 

 

भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

 

 

 

या प्रकरणात गणपत गायकवाड यांना अटक झाली. आता त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड थेट विरोधकांच्या प्रचारात दिसल्यानं खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

कल्याणमधून विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर उद्धव ठाकरेंनी इथून वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे.

 

 

 

तुरुंगात असलेले आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा ठाकरेसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात दिसल्या. दरेकर ओपन जीपमधून प्रचार करत असताना गायकवाड त्यांच्यासोबत होत्या.

 

 

 

 

 

यामुळे महायुतीत खळबळ उडाली. कल्याण, ठाण्यात शिंदेसेना आणि भाजपचे संबंध ताणले गेले आहेत. त्याचा कडेलोट गोळीबाराच्या घटनेतून झाला. यानंतर भाजपनं आपल्या बॅनरवरुन एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांचे फोटो हटवले.

 

 

 

 

 

उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर केली. पण ठाण्याचा तिढा कायम आहे. ठाण्यात राजन विचारे खासदार आहेत.

 

 

 

 

 

पक्षफुटीनंतर ते उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले. हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. ठाणे मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला आहे.

 

 

 

 

त्यांचे राजकीय गुरु आनंद दिघेंची कर्मभूमी म्हणूनही ठाण्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे ठाणे गमावल्यास ती शिंदेंसाठी मोठी नामुष्की असेल.

 

 

 

सुलभा गायकवाड राजकारणात फारशा सक्रिय नसतात. पती गणपत गायकवाड तुरुंगात गेल्यानंच त्या सक्रिय झाल्या. गायकवाड यांची नाराजी दूर करण्यासाठी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रयत्न केले.

 

 

 

 

त्यानंतरही गायकवाड या दरेकरांच्या प्रचारात दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. दुसरीकडे या सगळ्यामागे भाजपच असल्याची चर्चा आहे.

 

 

 

 

 

सुलभा गायकवाड राजकारणी नाहीत. त्यांचे पती तुरुंगात आहेत. भाजपपासून दुरावल्यास तुरुंगात असलेल्या गणपत गायकवाड यांच्या अडचणी वाढू शकतात याची जाणीव त्यांना आहे.

 

 

 

 

 

त्यामुळे गायकवाड स्वत:हून दरेकरांच्या प्रचारात जातील यावर कार्यकर्त्यांचा विश्वास नाही. या सगळ्यामागे भाजपच असल्याची कुजबूज आहे. कल्याणमध्ये दबाव वाढवून ठाणे पदरात पाडून घ्यायचं अशी रणनीती भाजपनं आखल्याचं बोललं जात आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *