बापरे .. भारतीय रहिवाश्याचा अमेरिकेत ४१ कोटींच्या बंगल्यात कुटुंब मृतावस्थेत
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या तिघांचे मृतदेह राहत्या घरात सापडले. अतिशय श्रीमंत दाम्पत्य आणि त्यांची लेक बंगल्यात मृतावस्थेत आढळली.
राकेश कमल (५७), त्यांची पत्नी टिना (५४) आणि १८ वर्षीय मुलगी एरियाना अशी मृतांची नावं आहे. मॅसाच्युएट्समधील बंगल्यात त्यांचे मृतदेह सापडले. या बंगल्याची किंमत ५० लाख डॉलर इतकी आहे. या बंगल्यात ११ बेडरुम आणि १३ बाथरुम आहेत.
अमेरिकन पोलीस तिघांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत. नोरफॉरचे अटॉर्नी मायकल मोरिसे यांनी घटना कौटुंबिक हिंसाचारातून घडल्याचं सांगितलं.
राकेश यांच्या मृतदेहाजवळ एक पिस्तुल सापडलं. पोलिसांनी ते ताब्यात घेतलं. कमल कुटुंब मॅसाच्युएट्समधील डोवर परिसरात राहतं.
हा भाग मॅसाच्युएट्सची राजधानी बोस्टनपासून ३२ किलोमीटरवर आहे. डोवर परिसरात अनेक उच्चभ्रू मंडळी वास्तव्यास आहेत. हा परिसर अतिशय सुरक्षित मानला जातो.
टिना आणि राकेश एडुनोवा नावाची कंपनी चालवायचे. २०१६ मध्ये त्यांनी कंपनीची स्थापना केली. विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक मदत करण्याचं काम ही कंपनी करायची.
विद्यार्थ्यांना शालेय, महाविद्यालयीन परिक्षेत गुण वाढवण्यास एडुनोवा मदत करायची. सुरुवातीला कंपनीनं चांगली प्रगती केली. त्यामुळे कमल कुटुंबाची आर्थिक भरभराट झाली. त्यांनी २०१९ मध्ये मॅसाच्युएट्समध्ये १९ हजार चौरस फुटांचा बंगला खरेदी केला.
अवघ्या २ वर्षांतच एडुनोवाला उतरती कळा लागली. डिसेंबर २०२१ मध्ये एडुनोवा कंपनी बंद झाली. त्यामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडलं.
त्यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असण्याची शक्यता आहे. कमल कुटुंबाशी बरेच दिवस संपर्क न झाल्यानं त्यांचा एक नातेवाईक बंगल्यावर गेला. तेव्हा त्याला तिघांचे मृतदेह दिसले आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.